Bandhkam Kamgar Yojana : संपूर्ण माहिती (२०२५): मागील काही वर्षांपूर्वी मी स्वतः एका "महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ" च्या साइटवर काम करायचो. त्यावेळी माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना "बांधकाम कामगार योजने" बद्दल फारशी माहिती नव्हती.
पण आता २०२५ मध्ये हि योजना विशेषतः तात्पुरत्या बांधकाम कामगारांसाठी खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही बांधकाम व्यवसायात असाल किंवा या योजनेचे फायदे घेऊ इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. Bandhkam Kamgar Yojana बद्दल सविस्तर माहिती वाचा.
बांधकाम कामगार योजना काय आहे?
ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे, जी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य, विमा आणि इतर खूप साऱ्या फायदे प्रदान करते. यामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जाते आणि त्यांना एका वर्षासाठी स्मार्ट कार्ड दिले जाते ज्याद्वारे ते विविध महाराष्ट्र सरकारी योजनांचे लाभ घेऊ शकतात.
बांधकाम कामगार योजनेच्या अटी व शर्ती
- - फक्त १८ ते ६० वयोगटातील बांधकाम कामगार पात्र आहेत.
- - बांधकामाच्या ठिकाणी किमान ९० दिवस काम केले आहे.
- - नोंदणी करताना आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र आणि कामगाराचा फोटो आवश्यक आहे.
- - कामगाराला स्मार्ट कार्ड मिळाल्यानंतर, तो विविध फायदे घेऊ शकतो.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभ
महाराष्ट्र सरकारची "महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ" म्हणजे बांधकाम कामगार योजना ही महत्व पूर्ण योजना आहे जी राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवते. बांधकाम कामगारांच्या या योजनांचा उद्देश कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि आर्थिक अनुदान देऊन मदत करणे होय. चला तर मग योजना खालीलप्रमाणे :
१. शैक्षणिक योजना -
- सामान्य शिष्यवृत्ती: कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती.
- परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती: परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक मदत.
- क्रीडा शिष्यवृत्ती: खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती.
- पाठ्यपुस्तक आर्थिक मदत: शैक्षणिक पाठ्यपुस्तकांसाठी अनुदान.
- एमएस-सीआयटी आर्थिक मदत: संगणक प्रशिक्षणासाठी मदत.
२. आरोग्य आणि आर्थिक सहाय्य योजना -
- गंभीर आजारांवर उपचार आर्थिक सहाय्य: हृदयरोग, असो किंवा कर्करोग, इत्यादींसाठी अनुदान दिले जाते
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY): कमी खर्चा वर कामगारांसाठी अपघात विमा इत्यादींसाठी अनुदान दिले जाते
- आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत: या योजनेत आत्महत्या करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबियांना अनुदान दिले जाते.
३. प्रशिक्षण आणि कौशल्य विकास योजना -
- चालक प्रशिक्षण: कामगारांना चालक प्रशिक्षण देणे.
- इंग्रजीसह परदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण: इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये प्रशिक्षण.
- स्पर्धा परीक्षा तयारी प्रशिक्षण: यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन
४. इतर योजना -
- साहित्य प्रकाशन अनुदान: पुस्तक प्रकाशनासाठी कार्यरत लेखकांना मदत.
- शिलाई मशीन अनुदान योजना: महिला कामगारांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना शिलाई मशीन प्रदान करणे.
- कामगार आणि कुटुंबियांचा लांब पल्ल्याचा प्रवास: रेल्वे/एसटी प्रवासासाठी सवलत.
पात्रता आणि अपात्रता
पात्रता:
- - बांधकाम क्षेत्रात काम करणारे तात्पुरते किंवा कायमचे कामगार.
- - कामगाराचे नाव कामगार विभागाच्या यादीत असले पाहिजे.
अपात्रता:
- - सरकारी कर्मचारी किंवा इतर संस्थांमध्ये कायमस्वरूपी नोकरी.
- - ज्यांना आधीच इतर सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ मिळत आहेत.
बांधकाम कामगारांना अर्ज करण्यसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- - आधार कार्ड
- - पत्त्याचा पुरावा
- - जन्मतारीख प्रमाणपत्र (शालेय प्रमाणपत्र/स्वतः साक्षांकित)
- - २ पासपोर्ट आकाराचे फोटो
- - बांधकाम ठेकेदार चे ओळखपत्र
बांधकाम कामगार म्हणून ऑनलाइन नोंदणी कशी करावी?
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या – [https://bocw.gov.in]
- नंतर नवीन नोंदणी - “बांधकाम कामगार नोंदणी” वर या नावावर क्लिक करा.
- नंतर फॉर्म भरा - सर्व विचारलेली माहिती भरा.आणि विचारलेले कागदपत्रे अपलोड करा.
- शेवटी सबमिट करा - सबमिट नावावर क्लिक करून नोंदणी क्रमांक मिळवा, तो सांभाळून ठेवा.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड करा
एकदा तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली की, तुम्ही तुमचे स्मार्ट कार्ड पण ऑनलाइन डाउनलोड करू शकता. हे कार्ड कामगारांना ओळखण्यासाठी वापरले जाते आणि त्यावर एक विशिष्ट असा ओळख क्रमांक असतो. तो स्मार्ट कार्ड हवा असेल तर आपल्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार च्या कार्यालयात जाऊन विचारणा केल्यानंतर लगेच मिळेल.
बांधकाम कामगार च्या नवीन सरकारी निर्णय
विषयः इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्याबाबत चा शासन निर्णय
- संदर्भः (१) सहायक कामगार अधिकारी तथा सचिव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांचे पत्र क्र.जा.क्र. मइवइबाकमं/ठराव-चर्चा/२०१५/३७०, दिनांक ४.२.२०१६.
- (२) कामगार आयुक्त यांचे पत्र क्र. का.आ./मइवइबांकम्र/२०१६/११८४, दिनांक २७.५.२०१६.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दिनांक १८.१.२०१६ रोजीच्या बैठकीत, मंडळाच्या अस्तित्वात असलेल्या योजनांच्या लाभाच्या रक्कमेत वाढ करण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला होता.
त्यानुसार मंडळाच्या विविध योजनांच्या लाभाच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत मंडळाने शासन मान्यतेकरिता पाठविलेल्या प्रस्तावास अनुसरुन मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांकरिता असलेल्या योजना सुधारित स्वरुपात राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
बांधकाम कामगारांच्या स्मार्ट कार्डसाठी निष्काळजीपणाबद्दल तक्रार कशी करावी?
अनेक बांधकाम कामगारांना त्यांचे स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी महिने वाट पहावी लागते. अनेक वेळा नियुक्त कर्मचारी निष्काळजी असतात, अर्ज घेत नाहीत किंवा लाच मागतात. अशा परिस्थितीत, तक्रार दाखल करणे हा एकमेव पर्याय उरतो. ऑनलाइन तक्रार (सर्वात सोपा मार्ग). कामगार विभागाकडे थेट लेखी तक्रार
जर ऑनलाइन तक्रार उपयुक्त नसेल तर कामगार आयुक्त कार्यालय किंवा जिल्हा बांधकाम कामगार मंडळाकडे लेखी अर्ज सादर करा.
तक्रार पत्राचे स्वरूप:
- कामगार आयुक्त/जिल्हा बांधकाम कामगार कल्याण मंडळ,
- [जिल्हा/शहराचे नाव]
- विषय: बांधकाम कामगारांच्या स्मार्ट कार्डसाठी निष्काळजीपणाची तक्रार
साहेब,
माझे नाव [तुमचे नाव] आहे, मी [स्थान] येथील बांधकाम कामगार आहे. माझा नोंदणी क्रमांक [आयडी] आहे. मी [तारीख] रोजी स्मार्ट कार्डसाठी अर्ज केला, परंतु [कार्यालय/कर्मचाऱ्याचे नाव] ने अद्याप कार्ड जारी केलेले नाही/लाच मागितली नाही/अर्ज नाकारला आहे.
म्हणून, मी या जिल्हा बांधकाम कामगार मंडळाकडे कामे करणाऱ्या कर्मचारी निष्काळजीपणाविरुद्ध तक्रार दाखल करत आहे. कृपया या संदर्भात त्वरित कारवाई करा.
धन्यवाद,
- [तुमचे नाव]
- [मोबाइल नंबर]
- [नोंदणी क्रमांक]
हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारन अधिक माहितीसाठी:
- हेल्पलाइन क्रमांक: १८००-१८०-४५४५
- अधिकृत वेबसाइट: https://mahabocw.in/
- राज्य कामगार विभागाची हेल्पलाइन (तुमच्या राज्यानुसार बदलते)
Bandhkam Kamgar Yojana Pdf Form
जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा आणि बांधकाम कामगार योजना अंतर्गत या सरकारी फायद्यांचा लाभ घ्या!
जर तुम्हाला Bandhkam Kamgar Yojana In Marathi 2025 ही माहिती उपयुक्त वाटली तर ती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा! जेणेकरून बांधकाम कामगार योजना पासून परीवारिक सदस्य किंवा मित्र बांधव ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.