Gram Panchayat get funds?: नमस्कार वाचक मित्रांनो, Maha M News Websites वर आले स्वागत आहे. आज मी तुम्हालाग्रामपंचायतीला निधी कसा मिळतो? अशी माहिती देत आहे. (How does the Gram Panchayat get funds?)
आज आम्ही महत्वाच्या म्हणजे, ग्रामपंचायतीला निधी कसा मिळतो?, भारत सरकारकडून मिळणारा निधी, राज्य सरकारकडून मिळणारा निधी, 3 स्थानिक महसूल (ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत) आणि तो योग्य कामी लागलेला आहे का?, अशी संपूर्ण माहिती देत आहे.
ग्रामपंचायतीला निधी कसा मिळतो ?
1 भारत सरकारकडून मिळणारा निधी
भारत सरकारकडून विविध योजना मधून मिळतो, आणि त्यांच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना निधी मिळतो :- वित्त आयोग निधी (Finance Commission Fund)
- प्रत्येक पाच वर्षांनी वित्त आयोगाकडून ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जातो.
- वित्त आयोगाकडून हा निधी ग्रामपंचायत मध्ये आरोग्य सेवा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, गटार यांसारख्या मूलभूत गरजा सुधरेल या साठी सुविधा पुरवण्यासाठी वापरला जातो.
- पेसा ग्रामपंचायत मध्ये पेसा निधी दिला जातो.
मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) हा निधी देखील दिला जातो.
- - रोजगार हमी योजनेसाठी मिळणारा निधी ग्रामपंचायतमार्फत खर्च केला जातो.
- गावातील रस्ते, तळे, विहिरी, जलसंधारण आदी कामांसाठी हा निधी वापरण्यात येतो.
- ग्रामपंचायत पेसा
स्वच्छ भारत अभियान निधी
- स्वच्छ भारत अभियानांतर्गत (Gram Panchayat get funds? 2.0 Yojana) गावात शौचालय बांधणी करण्यसाठी दिला जातो, घन कचरा व्यवस्थापन साठी आणि स्वच्छता कार्यक्रमासाठी निधी दिला जातो.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ta
- - ग्रामीण भागात घरकुल उभारणीसाठी हा निधी मिळतो.
जल जीवन मिशन निधी
- पाणीपुरवठा योजना आणि पाईपलाइन उभारणीसाठी केंद्र सरकार निधी देते.
2 राज्य सरकारकडून मिळणारा निधी
राज्य सरकार ग्रामपंचायतींना खालील प्रकारच्या निधीसाठी मदत करते :राज्य वित्त आयोग निधी
- राज्य सरकार ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि स्थानिक विकासकामांसाठी निधी देते.
बांधकाम आणि विकास निधी
- रस्ते, पूल, नाले, गटार, वीजपुरवठा यासाठी राज्य सरकारकडून निधी दिला जातो.
शालेय आणि आरोग्य सेवा निधी
- शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि आरोग्य केंद्रांच्या उभारणी व सुधारासाठी निधी दिला जातो.
3 स्थानिक महसूल (ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत)
- ग्रामपंचायत स्वतः उत्पन्न मिळवण्यासाठी खालील कर आणि शुल्क वसूल करतेः
घरपट्टी (House Tax)
- ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या घरांसाठी घरपट्टी आकारली जाते.
पाणीपट्टी (Water Tax)
- | गावातील पाणीपुरवठ्याची सेवा पुरवण्यासाठी पाणीपट्टी आकारली जाते.
व्यवसाय कर (Business Tax)
- | गावात असलेले व्यवसाय आणि किराणा दुकाने, इतर दुकाने यांच्यावर कर लावला जातो.
बाजार आणि हाट शुल्क
- | स्थानिक गावात आठवडे बाजार भरतो त्याचातून किंवा हाट यासाठी भाडे किंवा शुल्क वसूल केले जाते.
जमीन व वापर शुल्क
- | सार्वजनिक जागांचा वापर केल्याबद्दल ग्रामपंचायत शुल्क आकारते.
4 इतर स्त्रोत
दान आणि देणग्या
- | काही वेळा स्थानिक संस्था, एनजीओ किंवा व्यक्तीकडून निधी किंवा देणग्या दिल्या जातात.
स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि CSR निधी
- | काही कंपन्या आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत ग्रामपंचायतींना निधी देतात.
कर्ज आणि अनुदान
- | ग्रामपंचायतींना विशेष प्रकल्पांसाठी निधी असतो, तसेच सरकारी किंवा बँकांकडून कर्ज आणि अनुदान दिले जाते.
हेही वाचा : ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार अर्ज नमुना मराठीत
निष्कर्ष
आम्ही लिहून दिलेला वरील लेख आपल्याला आवडला असेल, "ग्रामपंचायतीला निधी कसा मिळतो?" (Gram Panchayat get funds?). आणि तो मागायचा अधिकार कोणाला आहे?, या आदेशात हे असतंः, अटी व शर्ती निधी कुठल्या योजनेतून आहे, काम आदेश, कसा मागायच?, कशी असते, त्या साठी हा लेख आपल्या मित्राला शेअर करा. किंवा आमच्या सोसिअल मिडियाला जॉईन व्हा. जेणेकरून अशाच नवनवीन माहिती मिळत राहतील. धन्यवाद.
ग्रामपंचायतीला निधीबद्दल थोडक्यात माहिती.Gram Panchayat get funds?
ग्रामपंचायतीला निधीचे मुख्य उद्देश | |
अधिकृत वेबसाइट | |
मुख्य वेबसाइट | |
Facebook चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी | |
व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी | |
टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी |