काम आदेश (Work Order) म्हणजे काय?: What is a Work Order?

Admin
0
What is a Work Order? : नमस्कार वाचक मित्रांनो, Maha M News Websaite वर आले स्वागत आहे. आज मी तुम्हाला काम आदेश (Work Order) म्हणजे काय? अशी माहिती देत आहे. ( What is a Work Order?)

आज आम्ही महत्वाच्या म्हणजे, काम आदेश (Work Order) म्हणजे काय? आणि तो मागायचा अधिकार कोणाला आहे?, या आदेशात हे असतंः, अटी व शर्ती निधी कुठल्या योजनेतून आहे, काम आदेश, कसा मागायच?, अशी संपूर्ण माहिती देत आहे.
काम आदेश (Work Order) म्हणजे काय?: What is a Work Order?

काम आदेश (Work Order) म्हणजे काय? आणि तो मागायचा अधिकार कोणाला आहे?

काम आदेश म्हणजे एखाद्या सरकारी / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जसे की - ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद) वतीने दिलेला एक लिहित आदेश असतो, ज्यामध्ये ठराविक काम कोणाकडून, कोणत्या अटींवर, किती रकमेसाठी करून घ्यायचं आहे हे नमूद केलेले असते.

या आदेशात हे असतंः

  1. | कामाचं नाव (उदाहरणार्थ – पाण्याच्या टाकीची दुरुस्ती)
  2. ठेकेदाराचं नाव
  3. मंजूर रक्कम
  4. कामाचा कालावधी
  5. अटी व शर्ती
  6. निधी कुठल्या योजनेतून आहे (उदा. 15 व्या वित्त आयोगातून)
  7. काम आदेश मिळाल्याशिवाय कोणतंही काम सुरू करता येत नाही.

काम आदेश मागायचा अधिकार कोणाला आहे?

1 ठेकेदार / पुरवठादार / काम करणारा व्यक्ती / संस्था

  • ज्याच्याकडून काम करून घेतलं जाणार आहे, त्या व्यक्तीला किंवा संस्थेला काम सुरु करण्यापूर्वी काम आदेश मागायचा पूर्ण अधिकार असतो.

2 ग्रामपंचायत सदस्य / सरपंच / उपसरपंच / नगरसेवक

  • ते देखील गावातील कामाबाबत काम आदेशाची कॉपी मागू शकतात कारण काम सार्वजनिक पैशातून होणार असतं आणि लोकांना माहितीचा अधिकार (RTI) आहे.

4 गावकरी / सामान्य नागरिक

  • सार्वजनिक निधी मधून एखादे काम होत असेल तर कोणताही नागरिक माहिती अधिकार कायदा द्वारे  (RTI) काम आदेशाची कॉपी मागू शकतो

काम आदेश कसा मागायच?

1 ठेकेदार म्हणून 

  • संबधित कार्यायाकडून (उदा. ग्रामपंचायत / पंचायत समिती) थेट मागू शकतो.

2 सदस्य किंवानागरिक म्हणून

  • ग्रामसेवक / सपंचकडे विनंती करू शकतो.
  • अधिकृतरित्या RTI द्वारे अर्ज करून मागवू शकतो.

महत्त्व का आहे?

  • काम आदेशाशिवाय जर काम सुरू केलं, तर पुढे त्या कामाचे पैसे मिळण्य अडचण येते.
  • भ्रष्टाचार टाळण्यासाठी सार्वजनिक पद्धतीने काम आदेश दिसणं गरजेचं असतं.
  • पारदर्शकता येते.

काम आदेशाची महत्त्वाची वैशिष्ट्ये

1 लेखी स्वरूपात असतो

  • कामाचा तोंडी आदेश ग्राह्य धरला जात नाही.
  • "काम आदेश" चे कोणतीही अधिकृत कागदपत्र मानली जाणारी गोष्ट असणे.

2 मंजूरीशिवाय काम केलं तर?

  • जर ठेकेदाराने/कोणत्याही व्यक्तीने काम आदेशाशिवाय काम केलं, तर त्या खर्चाची देयके सरकारकडून मिळत नाहीत.
  • त्यावर नंतर वितरीत निधी मिळू शकत नाही.

3 कोणत्या परिस्थितीत दिला जातो?

  • (सर्वसाधारणपणे ग्रामसभेचा ठराव / समितीचा ठराव घेतल्यावर) कोणत्या हि परीस्थित काम मंजूर झाल्यावर होते.
  • मंजूर अंदाजपत्रकात (estimate) निधी उपलब्ध असेल.
  • प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता मिळाल्यावर.

काम आदेश कुठे ठेवतात ?

  • सरकारी कार्यालयाच्या रेकॉर्डमध्ये.
  • संबंधित ठेकेदार / पुरवठादारकडे एक प्रत.
  • लेखापाल / ऑडिटरकडे.

काम आदेश कोण देतो ?

  • ग्रामपंचायतीमध्ये - ग्रामसेवक व सरपंच यांच्या सहीने
  • | नगरपालिकेत - मुख्याधिकारी / अभियंता यांच्या सहीने
  • पंचायत समितीमध्ये BDO / गटविकास अधिकारी
  • जिल्हा परिषदेमध्ये कार्यकारी अभियंता / CEO यांच्या सहीने

काम आदेश (Work Order) चा नमुना

कार्यालय : ग्रामपंचायत [गावाचे नाव], तालुका [तालुक्याचे नाव],
जिल्हा [जिल्हा नाव]
दिनांक : [दिनांक]
काम आदेश क्रमांक: GP/ [क्रमांक]/2025-26

प्रति,
[ठेकेदाराचे नाव / संस्थेचे नाव]
पत्ताः [पूर्ण पत्ता]
विषयः पाणी पुरवठा योजना अंतर्गत नळ योजना दुरुस्तीचे काम आपणास सूचित करण्यात येते की, खालीलप्रमाणे काम आपल्याकडे मंजूर करण्यात आले आहेः
  • 1 कामाचे नाव: नळ योजना दुरुस्ती
  • 2 मंजूर रक्कम: ₹ 1,25,000/-
  • 3 कामाचा कालावधी: आदेशापासून 30 दिवसांच्या आत पूर्ण करणे
  • 4 निधीचा स्रोत: 15 वा वित्त आयोग (सामान्य निधी)
  • 5 अटी व शर्ती:
- काम दर्जेदार करणे
- लेखी परवानगी शिवाय अतिरिक्त काम करु नये
झाल्या कामाचा परोक्षणासाठी तपशील द्यावा.
आपल्याला विनंती आहे की, वरील काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे.
आपला,
(सही)

RTI द्वारे काम आदेश मागण्याचा अर्ज

ग्रामसेवक/सरपंच
ग्रामपंचायत [गावाचे नाव]
तालुका [तालुका नाव], जिल्हा [जिल्हा नाव]
RTI द्वारे काम आदेश मागण्याचा अर्ज

प्रति,
लोक माहिती अधिकारी,
ग्रामपंचायत [गावाचे नाव],
तालुका [तालुका नाव], जिल्हा [जिल्हा नाव]

विषयः माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत माहिती मागणी काम आदेशाबाबत

महोदय,

मी [तुमचं नाव शैलेश लालसिंग पावरा], रा. [न्यू बोराडी), ग्रामपंचायत [गावाचे नाव] येथे राहतो. माझ्या गावात [कामाचं नाव - उदा. पाणी पुरवठा योजना  रस्ता दुरुस्ती इत्यादी] हे काम चालू आहे/झाले आहे. सदर कामासाठी काम आदेश कोणत्या तारखेला व कोणत्या अटींवर दिला गेला आहे, याची माहिती मिळावी. अर्जासोबत ₹ 10/- इतके RTI शुल्क जोडले आहे. मी मांगीतलेली सदर माहिती मला लेखी स्वरूपात व आवश्यक असल्यास छायांकित प्रत स्वरूपात 30 दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी
  • आपला
  • [तुमचं नाव ]
  • पत्ताः [पूर्णपत्ता]
  • दिनांकः

निष्कर्ष 

आम्ही लिहून दिलेला वरील लेख आपल्याला आवडला असेल, "काम आदेश (Work Order) म्हणजे काय?" (What is a Work Order?). आणि तो मागायचा अधिकार कोणाला आहे?, या आदेशात हे असतंः, अटी व शर्ती निधी कुठल्या योजनेतून आहे, काम आदेश, कसा मागायच?, कशी असते, त्या साठी हा लेख आपल्या मित्राला शेअर करा. किंवा आमच्या सोसिअल मिडियाला जॉईन व्हा. जेणेकरून अशाच नवनवीन माहिती मिळत राहतील. धन्यवाद.

जुना फ्लॅट घेताना काय काळजी घ्यावी? बद्दल थोडक्यात माहिती.

जुना फ्लॅटचे मुख्य उद्देश

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट

येथे क्लिक करा

मुख्य वेबसाइट

येथे क्लिक करा

Facebook चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)