Rojgar Hami Yojana Mahiti Adhikar Arj : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही भारतातील केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी ग्रामीण भागातील बेरोजगार लोकांना १०० दिवसांची कामाची रोजगार म्हणून हमी देते.
परंतु या योजनेतून अनेक ठिकाणी भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि कामाच्या निष्काळजी मुळे या योजनेतील पैसे योग्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत.
![]() |
Rojgar Hami Yojana Mahiti Adhikar Arj |
अशा परिस्थितीत, तुम्ही माहिती अधिकार कायदा अंतर्गत (आरटीआय कायदा २००५) हा कायदा वापरून रोजगार हमी योजना (mnrega) योजनेबद्दल सर्व माहिती मागू शकता आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करू शकता.
या लेखात, आपण रोजगार हमी योजना (mnrega) योजनेबद्दल माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा, तो कुठे सादर करावा आणि त्याचा योग्य पाठपुरावा कसा करावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
- कामाचा पगार थेट DBT द्वारे बँक खात्यात.
- बेरोजगार पुरुष आणि महिलांना समान वेतन.
- काम न मिळाल्यास किंवा उपलब्ध नसल्यास बेरोजगारी म्हणून भत्ता.
मी, [आर्जदार चे नाव], [अर्जदारचे गावाचे नाव] चा कायमस्वरूपी रहिवासी आहे. माहिती अधिकार कायदा, २००५ अंतर्गत मला खालील प्रमाणे माहिती माहिती मिळावे.
धन्यवाद,
अशा अधिक महत्त्वाच्या माहितीसाठी, www.mahamnews.com ला भेट द्या! आमच्या सोशिअल मीडिया ला जॉईन व्हा.
या लेखात, आपण रोजगार हमी योजना (mnrega) योजनेबद्दल माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा, तो कुठे सादर करावा आणि त्याचा योग्य पाठपुरावा कसा करावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
भाग १: राष्ट्रीय रोजगार हमी योजना (mnrega) माहिती
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे वाचा:
- १०० दिवसांची रोजगार हमी.- कामाचा पगार थेट DBT द्वारे बँक खात्यात.
- बेरोजगार पुरुष आणि महिलांना समान वेतन.
- काम न मिळाल्यास किंवा उपलब्ध नसल्यास बेरोजगारी म्हणून भत्ता.
रोजगार हमी योजना (mnrega) अंतर्गत सामान्य अनियमितता:
- १. गावातील बनावट कामगार याद्या - कामात अस्तित्वात नसलेल्या लोकांची नावे वापरून हप्त्यांमध्ये पैसे काढून घेणे.
- २. वेतनात अनियमितता - मजुरी करून घेणाऱ्या कामगारांना पूर्ण वेतन मिळत नाही.
- ३. केलेल्या कामाची नोंद नाही - काम झाल्यानंतरही 100 दिवसाची गणना ची नोंद नाही.
- ४. मिळालेल्या साहित्याचा गैरवापर - योजनेतून मिळालेल्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार.
- ५. विकास कामाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी न होणे - केलेल्या कामाचे पैसे खर्च करूनही काम पूर्ण होत नाही.
भाग २: माहिती अधिकार 2005 कायद्याची ओळख
- माहिती अधिकार २००५ च्या कायद्यानुसार, कोणताही सामान्य जनता गावातील नागरिक सरकारी योजनांविषयी माहिती मागू शकतो.
- रोजगार हमी (mnrega) योजना ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा पातळीवर राबविली जाते, म्हणून माहिती अधिकार अर्ज योग्य प्रथम जवळील अधिकाऱ्याकडे पाठवावा.
- जर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन १० रुपये शुल्क भरून अर्ज केला तर ३० दिवसांच्या आत माहिती मिळवणे बंधनकारक आहे.
भाग ३: रोजगार हमी (mnrega) योजनेबद्दल माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा?
1. योग्य अधिकारी कडे अर्ज सादर करा
- - गाव पातळी: ग्रामपंचायत सचिव (PIO)
- - तालुका स्तर: गट विकास अधिकारी (BDO)
- - जिल्हास्तरीय: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)
2. माहिती अधिकार 2005 कायदा अर्जाचे स्वरूप
अर्ज हा साध्या कागदावर हाताने मराठी, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये लिहिता येईल. त्यात खालीलप्रमाणे माहिती मांगणे आवश्यक आहे:- 1. पत्राचा विषय: “माहिती अधिकार कायदा अंतर्गत मनरेगा योजनेबाबत माहिती मागवणे”
- 2. अर्जदार चे नाव : संपूर्ण नाव लिहा
- 3. पत्ता: तुमचा पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक
- 4. माहिती सविस्तर लिहा: विषय सह स्पष्टीकरण देणारे माहिती ची प्रत विचारा.
- 5. फी: १० रुपये कोर्ट फी (जर तुम्ही बीपीएल असाल तर माहिती माफ होते. )
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार अर्जाचा नमुना
राष्ट्रीय रोजगार मी योजनेखालील रोजगार/ बेरोजगार भत्ता यासंबंधात माहिती अधिकार अर्जाचा नमुना
- प्रति, शासकीय माहिती अधिकारी
- (सार्वजनिक प्राधिकरणाचा पत्ता)
- विषय : माहिती अधिकार अधिनियम, २००५ खालील अर्ज "
- (अ) अर्जदाराचे नाव :
- (ब) पत्ता (अर्जदाराचा पूर्ण पत्ता) :
महोदय,
मी, ग्रामपंचायत ( ग्रामपंचायत चे नाव लिहा) गटातील येथील कायमस्वरूपी रहिवाशी असू, मला या ग्रामपंचायत मधील गावाच्या संबंधात मला पुढील माहिती द्यावी, ही विनंती. (Rojgar Hami Yojana Mahiti Adhikar Arj)
या विकास राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील सन 2022 ते सन 2025 कामांचा तपशील व हजेरीपट चे नकल प्रत मिळावे.
- (१) वरील गावातून राष्ट्रीय रोजगार हमी योजनेखाली, रोजगार (जॉब) कार्डासाठी आलेले अ
- (२) अशा अर्जदारांची सूची
- (३) अशा अर्जदारांच्या संबंधातील पुढील तपशील असलेली माहिती :
- (अ) अर्जदाराचे नाव व पत्ता
- (ब) अर्जाची तारीख
- (क) अर्जावर केलेल्या कारवाईचा तपशील (जॉब कार्ड दिले/दिले नाही/ प्रक्रियेशन)
- (ड) जॉब कार्ड दिल्याची तारीख
- (ई) जॉब कार्ड न दिल्याची कारणे
- (४) जॉब कार्ड मिळालेल्या व्यक्तींपैकी ज्यांनी कामासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींची संख्या व त्यांची यादी.
- (५) कामासाठी अर्ज केलेल्या अशा व्यक्तींच्या संबंधातील पुढील तपशील असलेली माहिती :-
- (अ) अर्जदाराचे नाव व पत्ता :-
- महत्त्वाचे नमुने
- (ब) अर्जाची तारीख :-
- (क) दिलेल्या कामाचे नाव :-
- (ड) काम दिल्याची तारीख :-
- (इ) कामासाठी प्रदान केलेली रक्कम :-
- (फ) रक्कम प्रदान केल्याची तारीख :-
- (TT) रक्कम प्रदान केल्याची नोंद असलेला तपशील अंतर्भूत असलेल्या नोंदवहीच्या भागाची साक्षांकित प्रत :-
- (ह) काम दिलेले नसेल तर, त्याची कारणे :-
- (६) काम दिलेले नसेल तर, बेरोजगार भत्ता दिलेला असल्यास पुढील माहिती अधिकार च्या
- (अ) बेरोजगार भत्ता दिलेल्या व्यक्तींची यादी
- (ब) बेरोजगार भत्ता म्हणून दिलेल्या रकमेचा तपशील असणाऱ्या अभिलेखाची साक्षांकित प्रत/प्रती
सदर अर्जाचे प्रारंभिक शुल्क म्हणून रु. १०/- इतकी रक्कम, कोर्ट फी स्टॅम्पच्या स्वरुपात/ वन पेस्टल ऑर्डरद्वारे/ चलानद्वारे/डी. डी. क्र. द्वारे मी सादर केली आहे. इंडियन ऑर्डरद्वारे/चलानद्वारे/डी.डी.
जर तुम्हाला असे वाटत असेल की, वरीलप्रमाणे मागितलेली माहिती तुमच्या विभागाशी संबंधित नसेल तर, माहिती अधिकारी अधिनियम, २००५ च्या कलम ६ (३) च्या तरतुदीचे पालन करून ५ दिवसांच्या आत, माझा अर्ज, समुचित प्राधिकरणाकडे विभागाकडे हस्तांतरित करा.
तसेच माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या तरतुदींनुसार वरील माहितीच्या संबंधातील तुमच्या उत्तरामध्ये तुमच्या विभागाच्या पहिल्या अपिलीय प्राधिकाऱ्याचा तपशील (नाव, पदनाम व पत्ता) द्या, म्हणजे गरज भासल्यास, मला त्यांच्याकडे पहिले अपील दाखल करता येईल. धन्यवाद,
- दिनांक
- अर्जदाराची सही
- ठिकाण
- अर्जदाराचे नाव
रोजगार हमी योजना (mnrega) नमुना आरटीआय अर्ज
- जन माहिती अधिकारी,
- [ग्रामपंचायत चे नाव / त्या कार्यालयाचे नाव],
- [तालुका, जिल्हा], महाराष्ट्र.
- विषय: माहिती अधिकारांतर्गत रोजगार हमी (mnrega) योजनेबाबत माहिती मिळावे.
मी, [आर्जदार चे नाव], [अर्जदारचे गावाचे नाव] चा कायमस्वरूपी रहिवासी आहे. माहिती अधिकार कायदा, २००५ अंतर्गत मला खालील प्रमाणे माहिती माहिती मिळावे.
- १. गेल्या 2 वर्षात [ग्रामपंचायत चे नावाने] मनरेगा अंतर्गत हाती घेतलेल्या प्रकल्पांची यादी नकल प्रत मिळावे.
- २. प्रत्येक प्रकल्पावर झालेल्या खर्च आणि त्या रकमेचा कामगारांना देण्यात येणाऱ्या वेतनाचा नोंदी ची नकल प्रत मिळावे.
- ३. गेल्या 1 वर्षात काम केलेल्या कामगारांची यादी (नाव, आडनाव, दिवस, पगार). नकल प्रत मिळावे.
- ४. या योजने अंतर्गत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता दिला गेला असेल तर त्याची नकल प्रत मिळावे.
- ५. रोजगार हमी योजना (mnrega) निधीचा वापर कसा झाला याचा सविस्तर अहवाल आणि नकल प्रत मिळावे.
धन्यवाद,
- [तुमचे नाव]
- [पत्ता]
- [मोबाइल नंबर]
- [तारीख]
माहिती अधिकार अर्ज सादर करणे आणि पाठपुरावा करणे
- - अर्ज पोस्टाने, प्रत्यक्ष भेटून किंवा ईमेलद्वारे पाठवा.
- -पोचपावती घ्या (अर्जावर तारीख आणि स्वाक्षरी मागवा).
- - जर ३० दिवसांच्या आत मांगितलेली माहिती मिळाली नाही तर प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करा.
माहिती मिळाल्यानंतरचे टप्पे
- १. चौकशी करा - जर कागदोपत्री कामात विसंगती आढळल्या तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करा.
- २. जवळील माध्यमांना माहिती द्या - जिल्हा, तालुक्यातील स्थानिक वृत्तपत्रांना माहिती द्या.
- ३. लोकायुक्त किंवा जवळील पोलिसांकडे तक्रार करा - जर गंभीर प्रकारचा भ्रष्टाचार असेल तर शासकीय वसुली सह कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करा.
निष्कर्ष
रोजगार हमी योजना (mnrega) माहिती अधिकार 2005 हा कायदा संविधानिक कायदाने हा एक शक्तिशाली मार्ग आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही रोजगार हमी योजना (मनरेगा) योजनेतील भ्रष्टाचार उघड करू शकता. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार एक अर्ज संपूर्ण गावाचे आयुष्य बदलू शकतो!अशा अधिक महत्त्वाच्या माहितीसाठी, www.mahamnews.com ला भेट द्या! आमच्या सोशिअल मीडिया ला जॉईन व्हा.