महाराष्ट्र पोलीस भरती पूर्ण माहिती !
महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2025 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेले आणि दिनांक 23 6 2025 च्या सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलिस आयुक्त पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस घटक कार्यालयाचे नाव नमूद करावे.पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज . Police Bharti 2025
त्यांचे आस्थापने वरील पोलीस शिपाई संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापने कडून भरण्यात येत असलेल्या पदाचा उल्लेख करावा यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदन पत्र संगणीय प्रणाली द्वारे दिनांक 9 / 11 / 2022 ते 30 11 2024 या कालावधीत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती ही पुढील संकेतस्थळावर देण्यात आणि प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.महाराष्ट्र पोलीस भरती पदे आणि पात्रता
पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable)
शैक्षणिक पात्रता
- (12वी पास) किंवा MSCIT .
- ST/SC/VJNT/OBC उमेदवारांसाठी (12वी पास पर्यंत.
वयोमर्यादा:
- किमान:18 वर्षे
- कमाल: 28 वर्षे (SC/ST/OBC/PWD साठी 5 वर्षे सवलत).
फिजिकल पात्रता:
पुरुष:
- उंची: 165 सेमी (SC/ST 160 सेमी)
- छाती: 79-84 सेमी (फुगवून 5 सेमी)
महिला:
- उंची: 157 सेमी (SC/ST 152 सेमी)
निवड प्रक्रिया
- 1. परीक्षा – 100 गुण (बहुपर्यायी प्रश्न)
- - सामान्य ज्ञान, गणित, तर्कशक्ती, मराठी/इंग्रजी.
- 2. शारीरिक चाचणी (Police Constable)
- अंतिम यादी (Final Merit List)
पगार
₹19,900/- ते ₹63,200/- (शासकीय नियमानुसार बदल असेल)
साधारण भरती वेळ
- प्रत्येक जिल्ह्यात जागा भरल्या जातात
- पोलीस भरतीमध्ये दर वर्षांनी या पदासाठी संधी येते
- 2025 मध्ये अनेक जिल्ह्यांत भरती अपेक्षित आहे
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा.
उमेदवारास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाइन आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.- पोलीस भरती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ. https://www.mahapolice.gov.in
- उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही.
- उमेदवारचे चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यात रद्द होईल.
पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज .
- पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे प्रथम 50 गुणांची शारीरिक परीक्षा चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापने वरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी.
भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1.10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.पुरुष उमेदवार :
- 1600 मीटर धावणे : 30 गुण
- गोळा फेक : 20 गुण
- एकूण गुण: 50 गुण
महिला उमेदवार :
- 800 मीटर धावणे : 30 गुण
- गोळा फेक : 20 गुण
- एकूण गुण: 50 गुण
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा.
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षा मध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येईल.पोलीस भरती प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणी.
शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल.हेही वाचा : पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र कसे काढावे.
निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. निवड सूची मध्ये उमेदवारांच्या नावाच्या समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे (Police Bharti Important Documents)
- दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
- शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
- आधार कार्ड
- कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ,
- नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ओबीसी, VJ,NT)
- लग्र झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहात स्त्री )
- ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.
पोलीस भरती वेळी ग्राउंडच्या आधी घ्यायची काळजी
- 1) बाहेरील अन्नपदार्थ, तळलेले, मसालेदार टाळावे.
- 2) पाणी भरपूर प्रमाणात प्या.
- 3) इल क्ट्रोल चे पाणी रोज एक लिटर चालू करा.
- 4) आहारमध्ये भाताचे प्रमाण वाढवा, जेणेकरून कार्ब चे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होईल.
- 5) भरपूर प्रमाणात विश्रांती घ्या.
- 6) गादी वर झोपायचे टाळा.
- 7) स्वतःचे शूज व स्पाइक यांची डागडुजी व्यवस्थित करून ठेवा.
- 8) डाएट मधे गव्हाची लापशी, नाचणी ची खीर यांचा समावेश करा.
- 9) प्रवास करताना काळजी घ्या.
- 10) अंडी, चिकन खाताना शक्यतो फक्त उकडलेले असावेत.
- 11) स्वतःवर विश्वास ठेवा, आपण केलेल्या कष्टाची जाणीव ठेवा.
- 10 मान ठेवून मैदानावर उतरा.
- 13) आपण केलेला सराव उत्कृष्ट आहे. याला आता फक्त आत्मविश्वास जोड पाहिजेल. त्यानंतर आपण मैदानावर उतरून आपले 100% द्या.
- 14) हा कोणताही, कोणाशीही स्पर्धा नाही, स्वतःशी केलेली एक झुंज आहे.
पोलीस भरती दिवसभराचे अभ्यासाचं नियोजन
8+8+8 पॅटर्न लक्षात ठेवा. जसे (8) तास अभ्यास, 8 तास झोप, 8 तास इतर कामे)- सकाळ : 06 ते 08 (व्यायाम आणि अंघोळ)
- सकाळ : 08 ते 09 (अभ्यास)
- सकाळ : 09 ते 10 (नाष्टा किंवा जेवण)
- सकाळ : 10 ते 01 (अभ्यास)
- दुपार : 01 ते 02 (जेवण)
- दुपार : 02 ते 03 (झोप)
- दुपार : 03 ते 05 (अभ्यास)
- संध्याकाळ : 05 ते 07 (व्यायाम/ग्राउंड/इतर)
- संध्याकाळ : 07 ते 08 (आराम/अभ्यास)
- रात्री: 08 ते 09 (जेवण)
- रात्री : 09 ते 11 (अभ्यास)
- रात्री: 11 ते 06 (झोप)
![]() |
Maharashtra Police Bharti 2025 Syllabus
मराठी :
- समानार्थी शब्द
- विरुद्धर्थी शब्द
- अलंकारिक शब्द
- लिंग
- वचन
- संधि
- मराठी
- वर्णमाला
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- काळ
- प्रयोग
- समास
- वाक्प्रचार
- मणी
भूगोल :
- महाराष्ट्राचा भूगोल
- भारताचा भूगोल
इतिहास :
- 1857 चा उठाव
- भारताचे व्हाईसरॉय
- समाजसुधारक
- राष्ट्रीय सभा
- भारतीय स्वतंत्र लढा
- ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
- 1909 कायदा
- 1919 कायदा
- 1935 कायदा
- हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
सामान्य विज्ञान :
- विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
- शोध व त्याचे जनक
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
सामान्य ज्ञान :
- विकास योजना -
- संपूर्ण विकास योजना
बुद्धिमत्ता चाचणी :
- संख्या मालिका
- अक्षर मालिका
- व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
- सांकेतिक भाषा
- सांकेतिक लिपि
- दिशावर आधारित प्रश्न
- नाते संबध
- घड्याळावर आधारित प्रश्न
- तर्कावर आधारित प्रश्न
पंचायतराज :
- ग्रामप्रशासन
- समिती व शिफारसी
- घटनादुरूस्ती
- ग्रामसभा व ग्रामपंचायत
- ग्रामसेवक
- पंचायत समिती
- जिल्हा परिषदा
- मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
- गटविकास अधिकारी BDO
- नगरपरिषद / नगरपालिका
- महानगरपालिका
- ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
- पुरस्कार -
- महाराष्ट्रचे पुरस्कार
- राष्ट्रीय पुरस्कार
- शौर्य पुरस्कार
- खेळासंबधी पुरस्कार
- आंतरराष्ट्रीय पुरस्कार
क्रीडा :
- खेळ व खेळाशी संबंधित चषक
- प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
- खेळ व खेळाडूंची संख्या
- खेळाचे मैदान व ठिकाण
- खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके
- महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
- आशियाई स्पर्धा
- राष्ट्रकुल स्पर्धा
- क्रिकेट स्पर्धा
राज्यघटना :
- भारताची राज्यघटना
- राष्ट्रपती
- लोकसभा
- राज्यसभा
- विधानसभा
- विधानपरिषद
- परिशिष्टे
- मूलभूत कर्तव्ये
- मूलभूत अधिकार
- मार्गदर्शक तत्वे
- राज्यपाल
- मुख्यमंत्री
- उपराष्ट्रपती
- पंतप्रधान
- संसद
गणित :
- संख्या व संख्याचे प्रकार
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
- कसोट्या
- पूर्णाक व त्याचे प्रकार
- अपूर्णांक व त्याचे प्रकार
- म.सा.वी आणि ल.सा.वी व
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- शेकडेवारी
- भागीदारी
- गुणोत्तर व प्रमाण
- सरासरी
- काळ, काम, वेग
- दशमान पद्धती
- नफा-तोटा
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- घड्याळावर आधारित प्रश्न
- घातांक व त्याचे नियम
निष्कर्ष
महाराष्ट्र पोलिस भरतीमध्ये कॉन्स्टेबल, या पदांसाठी मोठ्या संधी आहेत. शैक्षणिक, शारीरिक आणि लेखी परीक्षांची तयारी सुरूच ठेवा. आतची तयारी करून यश मिळवणे शक्य आहे.