![]() |
वाचले :- १. प्र. सहायक आयुक्त (प्रशासन) तथा प्रथम अपिलीय अधिकारी, मालेगाव महानगरपालिका यांचा दि. १३.०६.२०२५ चा अहवाल
२. जनमाहिती अधिकारी तथा प्र. प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. संजय पवार यांनी माहिती अधिकार अर्जदार यांना केलेले शिवीगाळ / धमकी प्रकरणी सोशल मिडीयावर प्रसारीत बातमी
३. आयुक्त, मालेगाव महानगरपालिका यांचे मामनपा/जा.क्र./आस्था/१०७३/२०२५ दि.१६.०६.२०२५ अन्वये दिलेली कारणे दाखवा नोटीस
४. अॅड. सुरेश महाले, मालेगाव यांनी श्री. संजय पवार यांचे करीता दि.१७.०६.२०२५ रोजी पाठविलेले नोटीस पत्र, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
जा.क्र.मामनपा/आस्था/५/०६/२०२५ दिनांक: १९/०६/२०२५
विषय :- सेवा निलंबित करुन विभागीय चौकशी सुरु करण्या बाबत
श्री. संजय दादाजी पवार, प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी, मालेगाव महानगरपालिका
आदेश
ज्याअर्थी, मालेगाव महानगरपालिका आस्थापनेवरील मुख्य अग्निशमन अधिकारी या पदाचा प्रभारी कार्यभार श्री. संजय दादाजी पवार, उप मुख्य अग्निशमन अधिकारी यांचेकडे सोपविण्यात आलेला आहे. अग्निशमन सेवा ही महत्वपुर्ण व अत्यावश्यक सेवा असुन सदर सेवेत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांनी नेहमी दक्ष राहुन कार्यालयीन कर्तव्य जवाबदारीने पाडणे आवश्यक असुन सबंधीतांचे वर्तन हे नेहमी सौहादपुर्वक व जबाबदारीने वागणे अभिप्रेत आहे.
आणि ज्याअर्थी श्री. रामदास कारभारी बच्छाव, रा. दरेगाव, ता. मालेगाव जि. नाशिक यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज देऊन अग्निशमन विभागातील हालचाल रजिष्टर संबंधित माहितीची मागणी केलेली होती. सदर माहितीने समाधान न झाल्याने अर्जदार यांनी प्र. सहायक आयुक्त (प्रशासन) तथा प्रथम अपिलीय अधिकारी यांचेकडे दि.२७.०५.२०२५ रोजी प्रथम अपिल केलेले आहे.
![]() |
आणि ज्याअर्थी प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहायक आयुक्त (प्रशासन) यांनी उक्त् प्राप्त अपिल अर्जाचे अनुषंगाने दि. १२.०६.२०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता त्यांचे दालनात सुनावणी आयोजित करण्यात आलेली होती. सुनावणी दरम्यान उपलब्ध कागदोपत्री पुरावे आणि अपिलार्थी व जनमाहिती अधिकारी या नात्याने युक्तीवादाची प्रक्रिया सुरु असतांना अपिलार्थी व जनमाहिती अधिकारी तथा प्र. प्रमुख अग्निशमन अधिकारी यांचेत वाचाबाची सुरु होऊन जनमाहिती अधिकारी.
यांनी अपिलार्थी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केलेली आहे. या संदर्भात सहायक आयुक्त (प्रशासन) यांनी सुनावणी दरम्यान वारंवार जनमाहिती अधिकारी यांना शांतता ठेवणेस व कार्यालयीन शिस्त राखण्याबाबत सुचना करुनही त्यांचे काहीएक न ऐकता अतिशय बेशिस्तपणे जाणीवपूर्वक वर्तणुक केलेली आहे.
सदरील गैरवर्तनाची चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झालेली असुन वृत्तपत्रात या संदर्भाने वातम्या देखील प्रसिध्द झालेल्या आहेत. त्याचे प्रमाणे मालेगाव महानगरपालिका प्रशासनास विविध माहिती अधिकार संघटना / कार्यकर्ते यांचे कडून यासंदर्भाने तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. सदरची बाब मालेगाव महानगरपालिकेची प्रतिमा मलीन करणारी आहे.
आणि ज्याअर्थी श्री. संजय दादाजी पवार, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी सामान्य नागरिक/अपिलकार यांचे सोबत उपरोक्त उल्लेखित नमुद गैरवर्तन करुन कार्यालयीन शिस्तीचा व नियमांचा भंग करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. त्यांचे उदघृत गैरवर्तनामुळे कार्यालयीन शिस्तीवर गंभीर प्रतिकुल परिणाम होण्याचा संभव आहे.
त्यांनी नेमुन दिलेल्या कर्तव्यात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता न राखता त्यांनी पदाचा दुरुपयोग करुन गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचे व मालेगाव महानगरपालिकेची प्रतिमा मलिन केल्याचे स्पष्ट होत आहे. व त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम १९७९ मधील नियम ३ (१) (एक) (दोन) (तीन) व माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील तरतुदीचा भंग केल्याच्या निष्कर्षाप्रती मी आलेलो आहे.
आणि ज्याअर्थी याकामी आपणास प्रकरणी २४ तासात खुलासा करणेकामी कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली होती. मात्र आपण सदर नोटीशीस मुदतीत समाधानकारक खुलासा करणे आवश्यक असतांना केवळ खुलाश्याकामी मोघम स्वरुपात मुदत मिळणेकामी वकीलांचे स्वाक्षरीने पत्र दिलेले आहे. ही बाब निश्चितच स्वीकाहार्य नाही.
(शिस्त व अपील) नियम
त्याअर्थी मी, आयुक्त तथा प्रशासक, मालेगाव महानगरपालिका उदघृत अशोभनीय गैरवर्तन प्रकरणी व सोशल मिडीयावरील व्हायरल चित्रफित तसेच वृत्तपत्रात प्रसिध्द वृत्त व महानगरपालिका प्रशासनास प्राप्त तक्रारी विचारात घेता, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (१) व ५६ (२) फ आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) चे अर्थातर्गत तरतुदीनुसार श्री. संजय दादाजी पवार, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी.
हेही वाचा : शासकीय अधिकारी यांना निलंबीत करायच्या नियम
मालेगाव महानगरपालिका यांना प्रस्तुत आदेशाचे दिनांका पासुन तात्काळ सेवानिलंबित करण्यात येत असुन, त्यांचे विरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ८ नुसार विभागीय चौकशी करण्यास मान्यता देत आहे.
श्री. संजय दादाजी पवार, यांना निलंबन काळात कुठलीही रजा अनुज्ञेय राहणार नाही. श्री. संजय दादाजी पवार यांनी आयुक्त, मालेगाव महानगरपालिका यांचे पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १६ मधील तरतुदी लक्षात घेता.
निलंबन कालावधीत, श्री. संजय दादाजी पवार यांना अन्य नोकरी किंवा वैयक्तिक उद्योगधंदे करता येणार नाहीत व असे केल्याचे आढळून आल्यास ते गैरवर्तणुकीबाबत दोषी ठरतील आणि त्यानुसार कार्यवाहीस पात्र ठरतील, व त्यामुळे ते निर्वाह भत्त्यावरील आपला हक्क गमावून बसतील.
शिवीगाळ / धमकी प्रकरणी सेवा निलंबित : नियम खालीलप्रमाणे वाचा
महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ६९ (४) व (६) नुसार विहीत केलेली प्रमाणपत्र प्रत्येक महिन्यात निर्वाहभत्त्याचे वाटप करण्यापुर्वी श्री. संजय दादाजी पवार यांनी आस्थापना शाखेत सादर करावीत.
![]() |
कारणे दाखवा नोटीस
ज्या अर्थी श्री. रामदास कारभारी बच्छाव, रा. दरेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज देऊन आपले कार्यालयाचे अग्निशमन हालचाल रजिष्टर संबधित माहितीचे मागणी उक्त अधिनियमाद्वारे केलेली होती.
आणि ज्या अर्थी जनमाहिती अधिकारी तथा प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार श्री. रामदास बच्छाव यांचे प्राप्त अर्जावर "माहिती निरंक आहे" याप्रमाणे दि.१७/०५/२०२५ रोजीच्या पत्राद्वारे अर्जदारास कळविलेले आहे.
आणि ज्याअर्थी आपण पुरविलेली माहितीने समाधान न झाल्याने अर्जदार यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार प्रथम अपिल हे आपले विभागाशी संबंधीत प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहा आयुक्त (प्र.) यांचे कडे दि. २७/०५/२०२५ रोजी केलेले होते.
आणि ज्याअर्थी प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहा आयुक्त (प्र.) यांनी उक्त प्राप्त अपिलाचे अर्जाच्या अनुषंगाने दि.१२/०६/२०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता सहा आयुक्त (प्र.) यांच्या दालणात सुनावणी आयोजित करण्यात आलेली होती.
आणि ज्या अर्थी सहा आयुक्त (प्र.) यांचे समक्ष प्रथम अपील सुनावणी दरम्यान उपलब्ध असलेले कागदोपत्री पुरावे आणि अपिलार्थी व जनमाहिती अधिकारी या नात्याने युक्तीवादाची प्रक्रिया सुरु असतांना अपिलार्थी व आपल्या दरम्यान बाचा बाची सुरु झालीः व यावेळी अपिलार्थी श्री. रामदास कारभारी बच्छाव यांनी अरे-तुरे केल्याचा आरोप करुन आपण श्री. रामदास कारभारी बच्छाव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
या संदर्भात सहा. आयुक्त (प्र.) यांनी आपणास घटनेवेळी वारंवार शांतता ठेवणेस व कार्यालयीन शिस्त राखण्याबाबत सुचना करुनही आपण त्यांचे काहीएक न एकता अतिशय बेशिस्तपणे जाणीवपूर्वक वर्तणुक़ केलेली आहे.
हेही वाचा : विस्तार अधिकारी यांना निलंबीत करायच्या शासन निर्णय.
आपले सदरील गैरवर्तनाची चित्रफित समाज माध्यामांवर व्हायरल झालेली असुन वृत्तपत्रात या संदर्भाने बातम्या देखील प्रसिध्द झालेल्या आहेत, त्याच प्रमाणे मालेगाव महानरगपालिका प्रशासनास विविध माहिती अधिकार संघटना / कार्यकर्ते यांचेकडुन तक्रारी प्राप्त झालेल्या असुन ही बाब मालेगाव महानगरपालिकेची प्रतिमा मलीन करणारी अशी आहे.
आणि ज्या अर्थी आपले यासंबधी कृत्य हे निश्चितच अत्यंत असभ्य, अशोभनीय तथा असमर्थनीय असुन लोकसेवकाकडुन अपेक्षित असलेल्या शिस्तबध्द व जबाबदारीपुर्वक तथा सौहादपुर्वक वर्तनाच्या पुर्णपणे विरोधात आहे. परिणामी मालेगाव महानगरपालिका प्रशासनाची प्रतिमा देखील मलिन झाली असुन आपल्या विरुध्द नियमानुसार सक्त कारवाई करण्यात यावी, याप्रमाणे प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहा आयुक्त (प्र.) यांच्याकडील दि.१३/०६/२०२५ रोजी अहवाल प्राप्त झालेला आहे.
त्या अर्थी आपण केलेले उक्त कृत्य हे अत्यंत गंभीर स्वरुपाची असुन आपण एक लोकसेवक असुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम १९७९ चे ३ व माहिती अधिकार अधिनियम २००५ चे नियमाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत असल्याने आपणा विरूध्द महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ५६ (२) (फ) नुसार निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये? या बाबतचा आपला खुलासा आपण २४ तासाच्या आत सादर करावा. उक्त विहित मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास आपले काही एक म्हणणे नाही असे गृहित धरुन आपणा विरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.