(PMFBY) प्रधानमंत्री पिक विमा योजना संपूर्ण माहिती:

Admin
0
Pradhan Mantri Pik Bima Yojana 2025 : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजना ही कृषी मंत्रालयाच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने सुरू केलेली पीक विमा योजना बद्दल माहिती देत आहे. तर महाराष्ट्र राज्यात देखील सुरु झालेली असून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्तींमुळे, कीटक आणि रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानापासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे असा आहे. 
Pradhan Mantri Pik Bima Yojana

प्रधानमंत्री पिक विमा योजना काय आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Pik Bima Yojana 2025) महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना परवडणाऱ्या प्रीमियमवर पीक विमा प्रदान करते. प्रधानमंत्री पिक विमा योजना ही राज्य सरकार ने थरवलेले विमा कंपन्या आणि बँकांच्या नेटवर्कद्वारे राबविण्यात येते ही योजना. ही योजना शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी पिक विमा प्रदान करते.

प्रधानमंत्री पिक विमा योजना फॉर्म भरण्याची तारीख आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय?

 चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया प्रधानमंत्री पिक विमा योजना म्हणजे "Pradhan Mantri Pik Bima Yojana 2025" (PMFBY) चे फॉर्म भरण्याची तारीख आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे? १८ फेब्रुवारी २०१६ रोजी सुरू झालेली "प्रधानमंत्री पिक विमा योजना" या वर्षी १ जुलै २०२५ पासून पीक विमा भरण्यास सुरुवात होणार आहे, तर यावर्षी पासून 1 रुपयात पिक विमा योजना बंद झाली आहे. 31 जुलै 2025 शेवटची तारीख राहील.

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2025 थोडक्यात माहिती

योजनेचे नाव

प्रधानमंत्री पिक विमा योजना

योजनेची सुरुवात कोणी केली.

प्रथम केंद्र सरकारने

Facebook चॅनेलमध्ये सामील व्हा.

 येथे क्लिक करा

व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील व्हा.

येथे क्लिक करा

टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा

येथे क्लिक करा

योजनेची सुरुवात कधी झाली

१८ फेब्रुवारी २०१६

योजनेचे मुख्य उद्देश

पिक विमा मिळावा, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

योजनेचे लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी

अर्ज करण्याची प्रक्रिया

ऑनलाइन आणि ऑफलाईन

अधिकृत वेबसाइट

येथे क्लिक करा

मुख्य वेबसाईट

येथे क्लिक करा


उद्दिष्टे 

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया प्रधानमंत्री पिक विमा योजना म्हणजे "Pradhan Mantri Pik Bima Yojana 2025" (PMFBY) चे उद्दिष्टे काय आहे? 

शेतकऱ्यांना भरपाई:

नैसर्गिक आपत्ती (नैसर्गिक आपत्तींमुळे, कीटक आणि रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या इ.) किंवा रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण प्रदान करणे.

कमी प्रीमियम दर:

शेतकऱ्यांकडून कमी प्रीमियम आकारून विमा प्रदान करा. (२% - रब्बी पिके, १.५% - खरीप पिके, ५% - बागायती पिके). अशा पद्धतीने असेल असे नाही, कारण हा आमचा अंदाज आहे. अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर शासन निर्णय वाचा.

कृषी जोखीम कमी करा: 

अनिश्चित हवामान असेल आणि इतर काही जोखमींपासून शेतकऱ्यांना बांधवांना योग्य वेळी योग्य संरक्षण प्रदान करा. 

कर्जमुक्त शेतीला प्रोत्साहन द्या:

प्रधानमंत्री पिक विम्याच्या संरक्षणासह, किंवा इतर जे काही असेल ते शेतकरी बांधवांना नवीन तंत्रज्ञानावर आणि सावकारांवर अवलंबून न राहता आत्मविश्वासाने शेती करू शकतात. कर्जमुक्ती साठी प्रोत्साहन करू शकता.

तंत्रज्ञानाचा वापर:

नवीन असा उपकरण म्हणजे ड्रोन, सॅटेलाइट इमेजिंग आणि आयओटी, सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पिकांचे निरीक्षण कसे करता येईल हि पारदर्शकता वाढवणे. देखील चांगले आहे. किंवा AI tool सारखे माहिती देणारे , प्रश्न सोडवू शकतात.

फायदे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया प्रधानमंत्री पिक विमा योजना म्हणजे "Pradhan Mantri Pik Bima Yojana 2025" (PMFBY) चे फायदे काय आहे?

शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा

  • - नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई. विमा संरक्षण शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न गमावण्याच्या भीती शिवाय शेती करण्याची परवानगी देते.

कमी प्रीमियम दर

  • - सरकार गरीब शेतकऱ्यांसाठी प्रीमियमवर सबसिडी देते.

सर्व पिकांसाठी कव्हर

  • - अन्नधान्य, तेलबिया, कापूस, ऊस, मका भाजीपाला यासारख्या अल्पकालीन पिकांना विमा लाभ मिळतो.

कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीचा विमा

  • - जर बँक किंवा इतर काही सहकारी संस्थेकडून कर्ज घेतले असेल तर PMFBY विमा पासून अनिवार्य आहे, जो कर्जाच्या जोखमींपासून संरक्षण प्रदान करतो.

त्वरीत दाव्याची प्रक्रिया

  • - तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांच्या नुकसानाचे त्वरित मूल्यांकन केले जाते (ड्रोन, सॅटेलाइट इमेजिंग).
  • - पिक विमा दाव्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (DBT) हस्तांतरित केली जाते.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर

  • - पीक नोंदणी आणि दाव्याची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केली जाते, ज्यामुळे भ्रष्टाचार आणि विलंब कमी होतो.

लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी विशेष फायदे

  • - लहान शेतकऱ्यांसाठी प्रीमियम कमी आहे, ज्यामुळे त्यांना आपत्तीच्या वेळी मोठ्या प्रमाणात आधार मिळतो.

शेतीसाठी स्थिरता

  • - विम्यामुळे शेतकऱ्यांना जोखीम पत्करण्याची आणि नवीन पद्धती, सुधारित बियाणे आणि सिंचन तंत्रे वापरण्याची परवानगी मिळते.

केंद्र आणि राज्य सरकारचा सहभाग

  • - राज्य आणि केंद्र सरकार प्रीमियममध्ये वाटा उचलतात, ज्यामुळे शेतकऱ्यांवरील भार कमी होतो.
  • कर्जाची सोय
  • - विमा बँका आणि वित्तीय संस्थांना शेतकऱ्यांना कर्ज देण्यास अधिक इच्छुक बनवतो.

प्रधानमंत्री पिक विमा योजना पैसा भरणा किती.

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया प्रधानमंत्री पिक विमा योजना म्हणजे "Pradhan Mantri Pik Bima Yojana 2025" (PMFBY) चे पैसा भरणा काय आहे? 
  • 1)सोयाबीन - 1160 रुपये
  • 2)कपाशी - 900 रुपये
  • 3)तूर - 470 रुपये
  • 4)मक्का - 90 रुपये
  • 5)मुंग - 70 रुपये
  • 6)उदित - 62 रुपये
  • 7)ज्वारी - 82 रुपये
वरील प्रमाणे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना  (PMFBY) खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ करीता प्रति हेक्टर रक्कम आता शेतकरी बांधवांना पिक विमा काढण्यासाठी लागणार आहे. तरी आता पासून कागदपत्रे  तयारीत ठेवा. 

आवश्यक कागदपत्रे

  • १) आधार कार्ड 
  • २) ७/१२ उतारा
  • ३) ८-खाते उतारा
  • ४) बँक पासबुक
  • ५) पिकपेरा स्वंयघोषणापत्र
  • ६) फार्मर आयडी 
  • ७) आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल 
आधार लिंक असलेल्या बँक पासबुकावर एक सारखं नावं पाहिजे ज्यांचं कागदपत्र हे क्लिअर असतील त्यांचाच पिक विमाचा फॉर्म भरण्यांत येतो, तसेच कागदपत्रे अगदी चांगले दिसायला हवे. ऑनलाईन फॉर्म भरतांना झेरॉक्स प्रत लागणार नाही. तसेच या वर्षी पासून Farmer Id असेल त्याच व्यक्ती चे फोर्म भरले जातील. तसेच या वर्षापासून केंद्र शासनातर्फे १ रुपयांचं पिकविमाचा फॉर्म भरणे बंद करण्यांत आलेलं आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

पिक विमाचा फॉर्म भरतांना घ्यावयाची काळजी  

शेतकर्‍यांची नावं हे ७/१२ व ८-अ खाते उतार्‍यावर वेगळं नावं आहेत व आधार कार्डावर तसेच बँकेच्या पासबुकावर वेगळं नावं असतील त्यांचा ऑनलाईन फॉर्म हा भरला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.  तसेच शेतकर्‍यांनी पिकविमाचा फॉर्म भरतांना खालीलप्रमाणे सर्व कागदपत्र हे ओरिजन स्कॅन करण्यासाठी सर्व घेऊन येणे. दरवर्षी शेतकर्‍यांचे फॉर्म हे पिक विमा कंपनीकडून रिजेक्ट होतात म्हणून सर्व शेतकर्‍यांनी ओरीजनल कागदपत्र स्कॅन करण्यासाठी घेऊन ऑनलाईन सायबर कडे घेऊन जाणे.
  • १) ७/१२ उतारा,
  • २) ८-अ खाते उतार्‍यावर,
  • ३) आधार कार्ड 
  • ४) आधार लिंक असलेला मोबाईल 
  • ५) पिकपेरा स्वंयघोषणापत्र
  • ६) फार्मर आयडी 

प्रधानमंत्री पिक विमा योजना Rejected होण्याचे कारणे 

  1. आधार कार्ड आणि पासबुक वर सारखे नाव नसल्याने 
  2. ओरीजनल कागदपत्र स्कॅन करून अपलोड न करणे.
  3. ऑनलाईन फॉर्म भरतांना झेरॉक्स प्रत अपलोड करणे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना चा शासन निर्णय PDF साठी क्लिक करा.

Pradhan Mantri Pik Bima Yojana GR शासन निर्णय
Pradhan Mantri Pik Bima Yojana GR शासन निर्णय 

प्रधानमंत्री पिक विमा योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : Pradhan Mantri Pik Bima Yojana Online Application Process

  • सर्वात पहिले "प्रधानमंत्री फसल विमा योजना" च्या https://pmfby.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर होमपेजच्या वरच्या "Sign In" नावावर क्लिक करा.
Pradhan Mantri Pik Bima Yojana Online Apply
Pradhan Mantri Pik Bima Yojana Online Apply

  • पॉपअप विंडोमध्ये, "तुम्ही शेतकरी आहात का? येथून लॉगिन करा. ह्या नावावर क्लिक करा" 
Log In Farmer

  • नंतर शेतकरी अर्ज पीक विमा अर्जासाठी पुढे जाण्यासाठी तुमच्या खात्यातून लॉगिन करा.
Farmer Application


  • नंतर पुढे. जर आधीच नोंदणीकृत असाल तर फार्मर आयडी नोंदणी केलेला मोबाईल नं. टाकून लॉग in करू शकता. नंतर मोबाईल नंबर, कॅप्चा कोड एंटर करा ओटीपीची विनंती करा OTP टाकून लॉग in व्हा.

Farmer login Mobile Number


नोंदणी फॉर्ममध्ये, खालील नवीन शेतकरी वापरकर्त्यासाठी नोंदणी करा असे चिन्हांकित केलेले सर्व शेत आवश्यक फील्ड भरा .

शेतकऱ्यांची माहिती

  • पूर्ण नाव : शैलेश लालसिंग पावरा
  • पासबुकचे नाव : शैलेश लालसिंग पावरा
  • नातेसंबंध : आई- वडील, मुलगा-मुलगी, पती-पत्नी.
  • नातेसंबंध : नातेसंबंध धारकाचे पूर्ण नाव लिहा.
  • मोबाइल नंबर : टाका ७०६६४८०००० पडताळा करा.
  • वय : टाका.उदा. 30
  • जात श्रेणी : उदा. अनुसूचित जमाती 
  • लिंग : स्त्री / पुरुष
  • शेतकरी प्रकार : लहान, मोठे.
  • शेतकरी श्रेणी: मालक- विकत घेतलेलं.
Register for New Farmer User

निवासी तपशील

  • राज्य : महाराष्ट्र
  • जिल्हा: (उदा. धुळे)
  • उपजिल्हा : (उदा. शिरपूर)
  • निवासी गाव/शहर: (उदा .नवीन बोराडी)
  • पत्ता नवीन :  (उदा .नवीन बोराडी)
  • पिन कोड :  (उदा .४२५४२८ ) 
  • शेतकरी आयडी : आयडी प्रकार
  • यूआयडी : यूआयडी क्रमांक
  • २३६६-११६-९0000 व्हेरिफायअरो_फॉरवर्ड
  • खात्याचे तपशील : तुमच्याकडे आयएफएससी आहे का?
  • आयएफएससी: आयएफएससी प्रविष्ट करा
  • राज्य
  • राज्य : महाराष्ट्र
  • जिल्हा: (उदा. धुळे)
  • बँकेचे नाव : बँकेची शाखा निवडा
  • बँकेचे खाते क्रमांक : बँकेचे खाते क्रमांक प्रविष्ट करा: बँकेचे खाते क्रमांक निश्चित करा
  • कॅप्चा कोड प्रविष्ट करा : वापरकर्ता तयार करा.
Registration New Farmer
Registration New Farmer  
  • नोंदणी फॉर्मच्या Next वर क्लिक करा.
  • नंतर पुढे कोणते पिक आहे आणि किती क्षेत्र पिक विमा पाहिजे त्याची माहिती टाका.
  • नंतर पुढे १) ७/१२ उतारा, २) ८-अ खाते उतार्‍यावर, ३) आधार कार्ड  ४) पिकपेरा स्वंयघोषणापत्र अशी कागदपत्रे PDF स्वरुपात 200KB मध्ये अपलोड करा. 
  • नंतर पुढे विचारलेली रक्कम ऑनलाईन ATM, Debit card, UPI, अशा द्वारे पेमेंट करू शकता. 
  • नंतर पुढे तुम्हाला यशस्वी पेमेंट केल्यानंतर, तुम्ही पेमेंट पावती प्रिंट करू शकता.
  • सबमिट केलेल्या सर्व कागदपत्रांच्या प्रती आणि भविष्यातील संदर्भासाठी पावती ठेवा.

तुमच्या अर्जाचा मागोवा घ्या Pradhan Mantri Fasal Bima Yojana Application Status

  • तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट द्या वर अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता
  • https://pmfby.gov.in/farmerLogin आणि होम पेजवरील 'अर्ज स्थिती' पर्यायाद्वारे.
https://pmfby.gov.in/farmerLogin / 'Application Status'
'Application Status' 

  • सर्वात पहिले "प्रधानमंत्री फसल विमा योजना" च्या https://pmfby.gov.in अधिकृत वेबसाइटहोम पेजवरील 'Application Status' पर्यायाद्वारे तुम्ही अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता. 
  • त्यानंतर होमपेजच्या वरच्या "Application Status" नावावर क्लिक करा.
  • पॉपअप विंडोमध्ये, "फार्मर आयडी" टाका  
  • पेमेंट पावती नं टाका 
  • नंतर Captcha Cod टाका.
  • नंतर खाली सबमिट नावावर क्लिक करून अर्ज मंजूर आहे किंवा नाही हे तपासू शकता.

कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा मदतीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आपले सरकार सेंटर केंद्राचे संपर्क करा. 

ऑफलाइन (कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आपले सरकार सेंटर द्वारे)

  • १: तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आपले सरकार सेंटरला भेट द्या. CSC आणि आपल सरकार सेंटर ही सरकारी अधिकृत केंद्रे आहेत जी नागरिकांना विविध सेवा प्रदान करतात.
  • २: CSC मधील CSC आणि आपल सरकार सेंटरला कळवा की तुम्ही PMFBY साठी अर्ज करू इच्छिता. जर तुम्हाला अर्जात मदत/मार्गदर्शन हवे असेल किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आपले सरकार सेंटरने तुमच्या वतीने योजनेसाठी अर्ज करावा असे वाटत असेल तर CSC ला कळवा.
  • ३: कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आपले सरकार सेंटरला आवश्यक फील्ड माहिती आणि आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी प्रदान करा.
  •  ४: तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आपले सरकार सेंटर ला लागू प्रीमियम रक्कम भरा. प्रीमियमची रक्कम पीक, राज्य  आणि इतर घटकांवर अवलंबून बदलू शकते.
  • ५: अर्ज सादर केल्याचा पुरावा म्हणून कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आपले सरकार सेंटर कडून पोचपावती मिळवा.

प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक पेरा फॉर्म PDF

निष्कर्ष:

"प्रधानमंत्री पिक विमा योजना" (Pradhan Mantri Pik Bima Yojana 2025) ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देते, तर घरबसल्या प्रधानमंत्री पिक विमा योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा. (Pradhan Mantri Pik Bima Yojana Online Application) ची माहिती मिळालीच असेल. प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतीला आर्थिक स्थिरता प्रदान करते आणि देशाच्या अन्न सुरक्षेत मदत करते. 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)