विस्तार अधिकाऱ्यांनवर माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

Admin
0
Vistar Adhikari Mahiti Adhikar Arj

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माहिती अधिकार (RTI - Right to Information) अंतर्गत विस्तार अधिकाऱ्यांनवर माहिती अधिकारचा अर्ज कसा करावा. या बाबतीत माहिती देत आहे, तसेच माहिती अधिकार द्वारे विस्तार अधिकाऱ्यांनवर अर्ज करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. विस्तार अधिकाऱ्यांकडून विशिष्ट माहिती मांगू शकता. 

विस्तार अधिकाऱ्यांनवर माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

अ) अर्जाचे स्वरूप:

  • - हाताने लिहिलेला / किंवा टाइप केलेला अर्ज : माहिती अधिकार अर्ज हा साध्या कागदावर असू शकतो. कोणतेही विशेष असा फॉर्मची आवश्यकता राहत नाही.
  • - भाषा : अर्ज मराठीत हिंदीत किंवा इंग्रजी मध्ये लिहू शकता.

ब) माहिती अधिकार अर्जातील आवश्यक माहिती: 

  • - तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल (इच्छित असल्यास).
  • - ज्या विभागाकडून माहिती हवी आहे त्याचे नाव (उदा., जिल्हा पंचायत अधिकारी, तहसीलदार).
  • - माहितीचा स्पष्ट आणि संक्षिप्त उल्लेख (खाली उदाहरणे दिली आहेत)
  • - अर्ज कोणत्या माहिती अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे त्याचे नाव आणि पदनाम.
  • - शुल्क भरल्याचे तपशील (शक्य असल्यास).

विस्तार अधिकाऱ्यांकडून कोणती माहिती मागावी?

विस्तार अधिकाऱ्यांकडून खालील प्रकारची माहिती मागितली जाऊ शकते (उदाहरणे):
अ) सामान्य माहिती: 
- विभागाच्या योजनांचे तपशील, अंमलबजावणीचा अहवाल.
- ग्रामीण विकास खर्चाची तपशीलवार माहिती.
- नियुक्ती, खरेदी, टेंडरच्या प्रक्रियेसंबंधी दस्तऐवज.

ब) विशिष्ट प्रकल्पांसंबंधी: 

- "XYZ गावातील पाणी पुरवठा प्रकल्पाचा अंदाजित खर्च आणि खर्चाच्या वापराचा तपशील."
- "XYZ योजनेअंतर्गत दिलेल्या लाभार्थ्यांची यादी."

क) तक्रारींसंबंधी:

- "माझ्या तक्रारीवर (दिनांक तीस दिवसा अगोदर) कोणती कारवाई झाली?"
- "XYZ गावातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किती निधी मंजूर झाला?"

ड) निर्णयांची प्रत: 

- बैठकीच्या नोट्स, भ्रष्टाचार झालेल्या कार्यवाही ची आणि शासन नियमांच्या प्रती.

विस्तार अधिकाऱ्यांनवर माहिती अधिकाराचा अर्ज करायचा नमुना : Vistar Adhikari Mahiti Adhikar Arj 

सेवेस,
माहिती अधिकारी (PIO),
[विभागाचे नाव, उदा., जिल्हा पंचायत कार्यालय],
[पत्ता].
  • १. खालील माहिती माहिती अधिकार कायदा २००५ च्या कलम ६ अंतर्गत सादर करावी:
  • - [स्पष्ट माहितीचा उल्लेख, उदा., "२०२४-२५ मध्ये ABC योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांची यादी."]
  • २. माहिती हवी असल्यास:
  • - कागदपत्रांच्या प्रत स्वरूपात / साध्या कागदावर.
  • ३. शुल्क: नमूद केलेल्या पद्धतीने १० रु भरले जाईल.
भवदीय,
[तुमचे नाव],
[पत्ता],
[मोबाइल नंबर],
[दिनांक].

विस्तार अधिकारी वर शिस्त भंग ची कार्यवाही होऊ शकते का?

होय, विस्तार अधिकारी त्यांच्या पर्यवेक्षकाद्वारे किंवा उच्च-स्तरीय व्यवस्थापक किंवा प्रशासकाद्वारे निलंबित केले जाऊ शकतात. 

विस्तार अधिकार यांच्या विरोधात माहिती कोणती मांगावी? 

माहिती अधिकार द्वारे विस्तार अधिकारी यांना निलंबीत करण्याचा शासन निर्णय आदेश, नकल ची प्रत, माहिती अधिकार चा शिक्का सह मिळावे, विस्तार अधिकारी यांच्या वर निलंबीत करण्याचे पुरावे - गुन्हा दाखल करण्याचा शासन निर्णय आणि पुरावे अशी माहिती मांगावी.

विस्तार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा शासन निर्णय. Vistar Adhikari Mahiti Adhikar Arj 

सरकार विविध कारणांमुळे विस्तार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेऊ शकते. यात गैरवर्तनाचे आरोप, कार्यप्रदर्शन मानकांची पूर्तता करण्यात अपयश किंवा आचारसंहितेचे इतर उल्लंघन यांचा समावेश असू शकतो.

विस्तार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा निर्णय संबंधित सरकारी विभाग किंवा एजन्सीद्वारे घेतला जाईल आणि तो खटल्यातील तथ्ये आणि लागू कायदे आणि नियमांवर आधारित असेल. आरोपांच्या तीव्रतेनुसार, निलंबन तात्पुरते किंवा कायमचे असू शकते. विस्तार अधिकारी दोषी आढळल्यास, अधिकाऱ्याला दंड, तुरुंगवास आणि/किंवा इतर दंड होऊ शकतो.

भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल कसा होणार.

एखाद्या अधिकार्‍यावर भ्रष्टाचार केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला असेल, तर संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीद्वारे प्रकरणाची चौकशी केली जाईल. भ्रष्टाचाराच्या तीव्रतेनुसार, अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्ह्याचा आरोप लावला जाऊ शकतो आणि फौजदारी खटला चालवला जाऊ शकतो. दोषी आढळल्यास, अधिकाऱ्याला दंड, तुरुंगवास आणि/किंवा इतर दंड होऊ शकतो.

किती प्रकारचे विस्तार अधिकारी असतात?

विस्तार अधिकारी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि त्यांचे प्रकार देखील क्षेत्रानुसार बदलतात. विस्तार अधिकाऱ्यांचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

कृषी विस्तार अधिकारी

कृषी विस्तार अधिकारी यांचे कामे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, ची माहिती देणे, तसेंच पीक प्रणाली, सुधारित बियाणे, खते, सिंचन इत्यादींबद्दल योग्य ते मार्गदर्शन करणे असे त्यांचे कामे असतात. 

पशुसंवर्धन विस्तार अधिकारी

पशुसंवर्धन विस्तार अधिकारी यांचे कामे शेतकऱ्यांना पशुपालन, दुग्धव्यवसाय, रोग नियंत्रण, सारख्या पशुखाद्य इत्यादींबद्दल तांत्रिक सहाय्य प्रदान करतात त्याच्या विषयी माहिती देणे असतात.

मत्स्यपालन विस्तार अधिकारी

मत्स्यपालन विस्तार अधिकारी यांचे कामे मत्स्यपालन, कसे करावे तसेच जलसंधारण आणि मत्स्यपालनाबद्दल योग्य माहिती प्रदान करणे मत्स्यपालन योजना बद्दल महत्वाचे माहिती देणे. 

कुटुंब कल्याण विस्तार अधिकारी

कुटुंब कल्याण विस्तार अधिकारी यांचे कामे आरोग्य, पोषण, पुनरुत्पादक आरोग्य, बालसंगोपन योजना ची माहिती यासारख्या कुटुंब कल्याणकारी मुद्द्यांवर समुदायाला शिक्षित बद्दल महत्वाचे माहिती ची देवाण घेवाण करणे असे आहे.

ग्रामविकास विस्तार अधिकारी

ग्रामविकास विस्तार अधिकारी उमेद सारख्या महिला बचत गट (SHGs), रोजगार हमी योजना, बेरोजगार तरुणांना माहिती देणे, ग्रामीण उद्योग, पायाभूत सुविधा करणे तसेच महत्वाचे विकास यासारख्या क्षेत्रात काम करणे असे आहे.

सामाजिक वनीकरण विस्तार अधिकारी

सामाजिक वनीकरण विस्तार अधिकारी यांचे कामे वनीकरण भागात पर्यावरण संरक्षण करणे, वनपट्टे धारक शेतकरी यांना योग्य मार्गदर्शन करणे, जैवविविधता संवर्धन यासारख्या मुद्द्यांवर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे असे आहे.

महिला आणि बालविकास विस्तार अधिकारी

महिला आणि बालविकास विस्तार अधिकारी यांचे कामे हे महिला सक्षमीकरण योजना आणि त्याची माहिती देणे, बालसंगोपन योजना आणि त्याची माहिती देणे, पोषण आहार योजना आणि त्याची माहिती देणे, यासारख्या योजनांचे माहिती देणे असे कामे असतात. 

तंत्रज्ञान विस्तार अधिकारी 

तंत्रज्ञान विस्तार अधिकारी यांचे कामे शेतकऱ्यांना डिजिटल शेती कशी करावी, आयओटी, ड्रोन योजना आणि त्याचे तंत्रज्ञान, सौर ऊर्जा योजना आणि ai विकसित माहिती यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण बाबत माहिती देणे होय.

निष्कर्ष 

वाचक मित्रांनो प्रत्येक विस्तार अधिकारी एका विशिष्ट क्षेत्रात कामे पाहत असतो किंवा करत असतो. (उदा. शेती, पशुसंवर्धन, ग्रामीण विकास) असे काम करतो आणि त्यानुसार एखाद्या नागरिकाने केलेली तक्रारी ची चौकशी करणे आणि वरिष्ठ अधिकारी ला माहिती देणे असे असते. तसेच त्यांच्या कामाची देखील पाहणी केली जाते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)