अनेक कार्यालयांना ध्वजारोहणाचा विसर | Many offices forget about flag hoisting

Admin
0

Many offices forget about flag hoisting : नमस्कार दिपक पाचपुते, जिल्हाध्यक्ष – ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूह, अहिल्यानगर यांनी तालुक्यातील विविध कार्यालयांची पडताळणी केली असता, अनेक कार्यालयांना ध्वजारोहणाचा विसर पडला असे म्हटले आहे. चला तर मग सविस्तर बातमी वाचा.

Many offices forget about flag hoisting : अनेक कार्यालयांना ध्वजारोहणाचा विसर सविस्तर बातमी वाचा.

 दि. १७ : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन (१७ सप्टेंबर) हा प्रत्येक शासकीय, निमशासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांत ध्वजारोहण करून साजरा केला जातो. मात्र यंदा तालुक्यातील महसूल व आरोग्य विभागातील अनेक गावपातळीवरील कार्यालयांना ध्वजारोहणाचा विसर पडल्याचे समोर आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते दिपक पाचपुते यांनी तालुक्यातील विविध कार्यालयांची पडताळणी केली असता, अनेक तलाठी सज्जा कार्यालये व मंडळ कार्यालये ध्वजारोहणाशिवायच बंद अवस्थेत आढळली. तसेच काही ठिकाणी जिल्हा आरोग्य विभागाच्या उपकेंद्रातही कुलूपबंद स्थिती दिसून आली.

स्वातंत्र्यानंतर मराठवाडा मुक्तीसाठी झालेल्या ऐतिहासिक लढ्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी १७ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हास्तरावर पालकमंत्री उपस्थित राहून ध्वजारोहण करतात, तसेच गावागावांत ग्रामपंचायती व शासकीय कार्यालयांतही हा दिवस औचित्याने पाळला जातो.

मात्र, प्रत्यक्षात गावपातळीवरील अनेक कार्यालये बंद असल्याचे आणि ध्वजारोहण न झाल्याचे दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयांनी अशा ऐतिहासिक दिवसाचे औचित्य जपावे, अशी मागणी सामाजिक स्तरावरून होत आहे.

 महत्वाची सूचना Many offices forget about flag hoisting : अनेक कार्यालयांना ध्वजारोहणाचा विसर

मी दिपक पाचपुते, जिल्हाध्यक्ष – ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूह, अहिल्यानगर.

👉 माझा हा मेसेज तुम्हाला मिळाल्याचा अर्थ, तुमचा क्रमांक माझ्या प्रसारण यादीत समाविष्ट आहे.

👉 या माध्यमातून प्रशासनातील नवीन तरतुदी, शासन निर्णय, परिपत्रक, ऑर्डर, कायदेशीर संदर्भ तसेच माहिती अधिकारा संदर्भातील जनजागृतीचे मेसेज तुम्हाला वेळोवेळी मिळतील.

📌 तुम्हाला हे मेसेज नको असतील, तर कृपया नि:संकोच कळवा. तुमचं नाव यादीतून लगेच वगळण्यात येईल.

 *🙏 आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहे! Many offices forget about flag hoisting : अनेक कार्यालयांना ध्वजारोहणाचा विसर सविस्तर बातमी वाचा.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)