जिल्हाधिकाऱ्यांकडून सरकारी वाहनाचा गैरवापर, Jilhadhikari Kadun Sarkari Vahnacha Gairvapar

Admin
0

Jilhadhikari Kadun Sarkari Vahnacha Gairvapar : अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडून सरकारी वाहनाचा गैरवापर, महाराष्ट्र शासनाकडून कारवाई चे आदेश, भाऊसाहेब शिंदे चे आझाद मैदानावरील आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित.

Jilhadhikari Kadun Sarkari Vahnacha Gairvapar


प्रतिनिधी : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडून सरकारी वाहनाचा गैर वापर होत असल्या बाबत १८ ऑगस्ट २०२५ रोजी विविध कार्यालयात तक्रार दाखल केल्या होत्या, 

अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडून मार्च २०२५ पासून एम.एच.१६ सीडी.५८५७ ( इनोव्हा क्रिस्टा) पांढऱ्या रंगाची गाडी ( MH.16.CD.5857 ) या सरकारी वाहनाचा गैरवापर केला जात असून त्यांची पत्नी नातेवाईकांकडे जाण्यासाठी व स्व:ताच्या खाजगी कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या गाडीचा गैरवापर करत असून अनेक वेळा ही गाडी नगर शहरा सह कापड बाजार, भाजी मार्केट या परिसरात दिवस भर फिरताना दिसते , 

ही गाडी अहिल्या नगर जिल्ह्या बाहेर ही फिरत असते जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ.पंकज आशिया हे स्वतःच्या मुलांना वाडिया पार्क मैदान, जॉगिंग पार्क मैदान नगर, व इतर मैदानावर खेळायला पाठवण्यासाठी एम एच १६.सीडी.५८५७ या सरकारी गाडीचा वापर केला जातो 

मुलांना दररोज संध्याकाळी मैदानावर खेळायला नेले जाते मुलांचे खेळून होई पर्यंत सरकारी गाडी मैदानावर पार्किंग (उभी ) केली जाते लहान लहान मुले असल्याने त्यांचा सांभाळ करण्यासाठी मैदानावर सरकारी कर्मचारी महिलांना पाठवतात सरकारी वाहनाचा गैरवापर हा गंभीर गुन्हा आहे, 

सरकारी कामाशिवाय इतर कामांसाठी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी व मुलांना फिरण्यासाठी सरकारी वाहनाचा वापर केल्याचे पुरावे मैदानावरील जीपीएस (GPS) कॅमेरे ने काढलेले फोटो व व्हिडिओ तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ. पंकज आशिया यांच्या पत्नी या महाराष्ट्र शासनाची गाडी एम.एच.१६ सीडी ५८५७ ही घेऊन 

कापड बाजारात खरेदी करतानाचे जीपीएस (GPS) कॅमेरे ने काढलेले व्हिडिओ व फोटो पुरावा म्हणून उपलब्ध आहेत,यामुळे सरकारी तिजोरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने गैरवापर प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमावी , गैरवापर गंभीर असल्याने जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ. पंकज आशिया यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून तात्काळ निलंबित करावे

गैरवापर केलेला दंड वसूल करून वेतन वाढ रोखण्यात यावी , गैरवापर गंभीर असल्याने जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ . पंकज आशिया यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी १८ ऑगस्ट २०२५ रोजी 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच नाशिक आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करूनही जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने भाऊसाहेब शिंदे हे १५ सप्टेंबर २०२५ रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले.

मंत्री महोदय यांच्याबरोबर चर्चेनंतर प्रशासन स्तरावर हालचालींना वेग आला आणि उपोषणाच्या पाचव्या दिवशी शुक्रवार दिनांक १९ /०९/२०२५ रोजी मंत्रालय मुंबई येथे बैठक घेण्यात आली यानंतर महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ.पंकज आशिया यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले 

त्यात स्पष्ट सांगितले आहे की सखोल निःपक्षपाती चौकशी करून याबाबतचा अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह आवश्यक कागदपत्रांसह दोन दिवसात सादर करावा तसेच तक्रारदार भाऊसाहेब शिंदे त्यांच्याकडील जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या विरुद्ध सरकारी वाहनाचा गैर वापर केल्याच्या अनुसंगाने असलेले पुरावे विभागीय आयुक्त नाशिक यांना उपलब्ध करून द्यावेत 

शिंदे यांनी याबाबतचे सर्व पुरावे मंत्रालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दाखवले भाऊसाहेब शिंदे यांनी उपोषण सोडवण्याची विनंती करण्यात आली परंतु शिंदे नी जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली यावर महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले,

Jilhadhikari Kadun Sarkari Vahnacha Gairvapar

भाऊसाहेब शिंदे यांच्या सुरक्षा साठी अहिल्यानगर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्ग यांनी अहमदनगर येथून दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती पोलिस कर्मचारी हे चौवीस तास शिंदे यांच्यासमवेत मुंबईत होते अखेर भाऊसाहेब शिंदे यांनी आझाद मैदानावर सुरू असलेले पाचव्या दिवशीचे आमरण उपोषण स्थगित केले ,

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)