![]() |
Swachh Bharat Mission : स्वच्छता ही सेवा अभियान ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबवावी – मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी
अहिल्यानगर, दि.१३ - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे स्वच्छता ही सेवा (SHS) मोहीम १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.
या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२५ साठी "स्वच्छोत्सव" ही थीम निश्चित केली असून खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार आहेत –
१७ सप्टेंबर २०२५ रोजी मोहिमेचा शुभारंभ तालुका व गाव पातळीवर परिसर स्वच्छतेच्या उपक्रमाने होणार आहे. अभियान कालावधी : १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५
स्वच्छता लक्ष युनिट (CTUs) – अस्वच्छ ठिकाणांची निवड करून मॅपिंग व साफसफाई करण्यात येईल.
सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता – संस्था, प्रतिष्ठान व गर्दीच्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येईल.
सफाईमित्र सुरक्षा शिबिरे – सफाईमित्रांसाठी एक खिडकी योजना राबवली जाईल. आरोग्य कॅम्पद्वारे त्यांची तपासणी होईल. तालुका पातळीवर डिग्निटी कॅम्प घेऊन वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांचा लाभ सफाईमित्रांना दिला जाईल.
क्लीन ग्रीन उत्सव – पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सव साजरा केला जाईल.
प्रबोधनपर उपक्रम – स्वच्छ सुजल गाव, कचऱ्यापासून कलाकृती, स्वच्छ स्ट्रीट फूड केंद्र आदी.
एक दिवस – एक घंटा – एक सोबत : २५ सप्टेंबर २०२५ रोजी देशव्यापी श्रमदान होणार असून जिल्ह्यातील सर्व घटकांचा सहभाग राहील.
![]() |
हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव व स्वच्छ सुजल गाव विशेष ग्रामसभेत घोषित करता येतील. या विशेष ग्रामसभा १७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहेत.
स्वच्छता ही सेवा २०२५ मधील सर्व उपक्रम केंद्र शासनाच्या आयटी पोर्टलवर (https://swachhatahiseva.gov.in/) अपलोड केले जाणार असून त्याद्वारे शासनस्तरावर नियंत्रण ठेवले जाईल.
या सर्व उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले आहे.