आदिवासीनां भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.

Admin
0
आदिवासीनां भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.


सोमवारी , २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांच्यासोबत आदिवासीनां भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. 

ह्यावेळी आदिवासी समाजाचे नेते नामदार नरहरी झिरवाळ साहेब (अन्न व औषध प्रशासन मंत्री )तसेच मा आमदार.राजेंद्र गावित माजी मंत्री मा. आमदार.भिमराव केराम.मा आमदार आमश्या दादा पाडवी, 

मा आमदार राजेश पाडवी.मा आमदार शांताराम मोरे.आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी अशोक बागुल,राम चौरे,. के के गांगुर्ड, पंकज ठाकरे, डॉ. संजय दाभाडे,डॉ. संतोष सुपे,सतीश लेंभे, सविता लेंभे ताई आदी उपस्थित होते. बाह्य स्रोत भरती रद्द करावी.

धनगर व बंजारा सारख्या जातींना आदिवासींमध्ये घुसखोरी करू देऊ नये ह्या मागणीसह रोजंदारी शिक्षक यांना सेवेत सामावून घ्यावे , पेसा भरती नियमित करावी, अधिसंख्य पदावरील भरती त्वरित सुरू करावी, आदिवासी सल्लागार परिषदेच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झाली.

राज्यपालांनी आदिवासींनी सेंद्रिय शेती करावी अश्या सूचना केल्या व त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले.

पुढील काळात पुन्हा भेटू असेही त्यांनी सांगितले.

आदिवासीनां भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)