
दिनांक 2 मार्च 2026 रोजी नाशिक येथे, पेसा क्षेत्रातील 17 विविध संवर्गातील नोकर भरती संदर्भात खासदार श्री भास्कर भगरे, आदिवासी संघर्ष योद्धे कॉ जे पी गावित आणि जिल्ह्यातील युवक-युवती यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा केली.
पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) कायदा 1996 अंतर्गत आदिवासी बहुल भागातील युवकांना नोकरीं मिळावी यासाठी हा कायदा असून या कायद्याअंतर्गत येणाऱ्या तलाठी शिक्षक अंगणवाडी पर्यवेक्षक आरोग्य सेवक कृषी सहाय्यक ग्रामसेवक वनरक्षक या व इतर पदांची त्वरित भरती करावी अशी विनंती केली.
आदिवासी भागातील हजारो युवक उच्च शिक्षण घेऊन, पदवी हातात घेऊन नोकरीं शोधत आहेत, युवकांच्या हाताला काम नाही, नोकरीं मिळत नाही त्यामुळे अनेक युवक युवतींचे भविष्य अंधारात चालले आहे.
तसेच कर्मचारी नसल्याने ग्रामीण भागातील शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे , ग्रामीण आदिवासी भागात जिल्हा परिषद शाळेत, आश्रमशाळेत अनेक ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे, आरोग्य विभागात कर्मचारी कमी आहेत, तलाठी ग्रामसेवक, इतर
