Banavat Kagadpatre | बनावट कागदपत्रांद्वारे मालकी हक्क मिळवण्याचे प्रकार जाणून घ्या.

Admin
0
Banavat Kagadpatre | बनावट कागदपत्रांद्वारे मालकी हक्क मिळवण्याचे प्रकार,बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्ता, जमीन, घर, मालकी हक्क मिळवण्याचे प्रकार विविध स्वरूपांत आढळतात.
Banavat Kagadpatre | बनावट कागदपत्रांद्वारे मालकी हक्क मिळवण्याचे प्रकार जाणून घ्या.

यामध्ये मुख्यतः मालमत्ता, जमीन, घर किंवा इतर किमती मालमत्तांचे स्वामित्व बेकायदेशीर पद्धतीने हस्तगत करण्यासाठी खोटे (Banavat Kagadpatre) कागदपत्रे वापरण्याचे प्रकार समाविष्ट होतात.

बनावट विक्री करार (Sale Deed) तयार करणे

खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट ओळखपत्रांच्या आधारे विक्री करार तयार केला जातो. मूळ मालकाच्या नकळत त्याच्या नावावर असलेली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित केली जाते.

बनावट वारस हक्क पत्र तयार करणे

एखाद्या मालकाच्या मृत्यूनंतर खोट्या वारस हक्काचे पत्र तयार करून मालकी हक्क मिळवला जातो. यात बनावट जन्मदाखला, मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर वैध दस्तऐवजांच। वापर केला जातो.

मालकी हक्क पावर ऑफ ऍटर्नी द्वारे खोट्या हस्तांतरण

पावर ऑफ ऍटर्नी बनवून खोटी हस्तांतरण मालकी हक्क दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केला जातो. मूळ मालकाच्या नकळत किंवा त्याला फसवून हा प्रकार केला जातो.

बोगस प्रॉपर्टी कार्ड आणि जमीन नोंदणी पत्रे तयार करणे मालकी हक्क मिळवणे.

नगरपालिका किंवा महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने खोटी प्रॉपर्टी कार्ड किंवा नोंदणी पत्रे तयार केली जातात. हे कागदपत्र खरे असल्याचे भासवून मालकी हक्क मिळवला जातो.

खोटी ओळखपत्रे आणि दस्तऐवज वापरणे

आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्रांमध्ये बदल करून खोटी ओळख तयार केली जाते. या खोट्या कागदोपत्री ओळखीच्या आधारे मालकी हक्काचे खोटे कागदपत्र तयार केले जातात.

खोट्या कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे कोर्ट केस दाखल करणे

कोर्टात खोटे पुरावे (Banavat Kagadpatre) सादर करून मालकी हक्काचा दावा केला जातो. न्यायालयीन निर्णय खोट्या पुराव्यांच्या आधारावर घेण्याचा प्रयत्न केला जातो.

(Banavat Kagadpatre) फसव्या सावकारी व्यवहारांत मालकी हक्क हस्तांतरण

मोठी रक्कम देण्याचे आश्वासन देऊन मूळ मालकाला फसवले जाते. कर्ज न फेडल्याच्या सबबीवर मालमत्ता खोट्या कागदपत्रांच्या आधारे जप्त केली जाते.

प्रतिबंध आणि उपाय

मालमत्तेची नियमित नोंदणी तपासणे आणि प्रॉपर्टी कार्ड अद्ययावत ठेवणे. खोट्या कागदोपत्री पासून प्रतिबंध आणि योग्य उपाय समजून घ्या.

महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी ठेवणे.

जमीन, घर, मालमत्ता, इतर कोणतेही जागा हस्तांतरण करत असाल तर योग्य महत्वाचे कागदपत्रे तपासणी करणे, तसेच ते कागदपत्रे अपुरे आहेत कि, पूर्ण ते जाणून घेण्यासाठी एक नकल प्रत घेऊन वकीलाचा सल्ला घेणे. पोलीस, महसूल मधील अधिकारी यांच्याशी सल्ला घेणे. आणि ते कागदपत्रे सुरक्षित ठेवणे.

कोर्टात योग्य कागदोपत्री पुराव्यांसह विरोध करणे आणि पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणे.

जमीन नोंदणीच्या वेळी, अधिकारी विक्री कराराशी संबंधित सर्व तपशीलांची जर अशा प्रकाराची शंका भासत असेल, तर कसून तपासणी करतात. काही चूक आढळल्यास ती दुरुस्त करण्यास तत्काळ स्थानिक महसूल विभाग, पोलीस मार्फत सांगितले जाते. अशा परिस्थितीत, (मालमत्ता, जमीन, घर बाबत) विकणाऱ्या व्यक्तीच्या अशा चुकांकडे दुर्लक्ष करू नका. पोलीस ठाण्यात तक्रारी नक्कीच करा.

बनावट कागदपत्रे द्वारे जमीन मालमत्ता खरेदी करणे

बनावट कागदपत्रे द्वारे जमीन मालमत्ता खरी आहेत की बनावट? ते प्रथम तपासणे नंतर मालमत्ता, जमीन, घर खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासा, ती बनावट कागदपत्रे द्वारे फसवणूक असू शकते.

जमीन, मालमत्तेची कागदपत्रे खरी आहेत की खोटी हे कसे शोधायचे:

जर तुम्ही कोणतीही मालमत्ता, जमीन, घर खरेदी करत असाल तर प्रथम त्याचे ओरिजनल डॉक्युमेंट्स तपासा. मालमत्ता, जमीन, घर खरेदी आणि विक्री करताना अनेक प्रकारची कागदपत्रे वापरली जातात, म्हणून त्यांची माहिती मालमत्ता, जमीन, घर असणे आणि त्यांची तपासणी करणे खूप महत्वाचे आहे. अनेक वेळा घोटाळेबाज एकाच मालमत्ता, जमीन, घर जमिनीच्या अनेक नोंदणी करून लोकांची फसवणूक करतात.
मालमत्ता, जमीन, घर गुंतवणूक करणे हा तुमच्या पैशाने घेतलेल्या सर्वोत्तम निर्णयांपैकी एक आहे. आजकाल जमीन घोटाळ्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत असल्याने, जर तुम्ही मालमत्ता, जमीन, घर खरेदी करणार असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

मालमत्ता खरेदी करणे हे एक महागडे काम आहे, त्यामुळे करार अंतिम करण्यापूर्वी बनावट कागदपत्रे तपासणे खूप महत्वाचे आहे, विशेषतः आजकाल मालमत्ता, जमीन, घर नावाखाली फसवणुकीचे प्रकार समोर येत राहतात.

मालमत्ता, जमीन, घर घेतेवेळी कागदपत्रे खरी आहेत की खोटी?

खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही खरेदी करत असलेली मालमत्ता, घर किंवा फ्लॅट रजिस्ट्री, नकाशा, एनओसी, टायटल डीड, बोझन सर्टिफिकेट आणि बेनामा यासह अनेक महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात, त्यामुळे ही कागदपत्रे पूर्णपणे तपासण्याची गरज आहे.

जमीन भाडेकरूचे नियम आणि बनावट कागदपत्रे : 

तुम्ही जर फ्लॅट भाड्याने घेत असाल तर पहिले ओरिजिनल कागदपत्रे घरमालक कडून मागून पहा अन्यथा निष्काळजीपणाची शिक्षा होईल, जागा भाडेकरूच्या बनावट कागदपत्रे चुकीसाठी घरमालक जबाबदार असतो. सांभाळून राहावे अन्यथा तुरुंगात जावे लागेल.

बनावट कागदपत्रे आणि फसवणूक कशी टाळायची

मालमत्तेच्या जमीन व्यवहारात फसवणूक टाळायचे असेल तर ओरिजिनल कागदपत्रे दाखवण्यास नकार जर कोणी करत असेल तर मालमत्ता जमीन विक्रेत्याने काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे, (Banavat Kagadpatre) असे स्पष्ट समजावे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)