नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला तुमच्या सोबत फसवणूक, झाल्यास नुकसान भरपाई साठी तक्रारी अर्ज कसा लिहावा त्या बद्दल माहिती देणार आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घ्या.
![]() |
फसवणूक, झाल्यास नुकसान भरपाई साठी तक्रार अर्ज कसा लिहावा?
फसवणूक, झाल्यास नुकसान भरपाई साठी तक्रारीच्या अर्जात खालील मुद्दे स्पष्टपणे नमूद करावेत:1. व्यक्तिगत माहिती
- - तक्रारदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क नंबर, ईमेल.
- - शाळा, कॉलेज, संस्था असेल तर त्याचे नाव
2. फसवणूकीचा तपशील.
- - घटनेची कालावधी, तारीख, वेळ, ठिकाण.
- - फसवणूक कशी झाली (उदा., शाळेचा दाखला, Transfer Certificate).
- - जमा केलेली रक्कम (रुपये आणि पैशांमध्ये).
- - संशयित व्यक्ती शाळा कॉलेज/संस्थेची माहिती (नाव, संपर्क, पत्ता इ.).
3. पुरावे
- - संभाषणाचे रेकॉर्डिंग, व्हिडीओ रेकॉर्डिंग, ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरलेले पैसे स्क्रीनशॉट्स, ईमेल, एसएमएस, पावत्या, तज्ञांचे अहवाल इ. जोडावेत.
4. मागणी
- - दोन तीन वर्ष झाल्यास नुकसान भरपाईची मागणी स्पष्ट करावी.
- - न्यायालयीन/प्रशासकीय कारवाईची अपेक्षा नमूद करावी.
5. शेवट
- - अर्जाची तारीख आणि सही.
फसवणूक, झाल्यास नुकसान भरपाई साठी लेखी तक्रारी अर्ज कसा लिहावा?
मा. सो. आदिवासी विकास विभाग आयुक्त अधिकारी साहेब सो. नाशिक यांच्या सेवेसीदिनांक
अर्जदार : शैलेश लालसिंग पावरा राहणार न्यू बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे मोबाईल नंबर 70 66 48 70 xx
विषय : नाशिक येथील भुजबळ कॉलेज प्रशासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांची फसवणूक चौकशी होणे बाबत.
महोदय
मी आपणास विनंतीपूर्वक लेखी तक्रार अर्ज सविस्तरपणे कथन करीत आहे वरील विषयाला अनुसरून दिनांक 15 6 2025 ऍडमिशन घेतली होती नियमानुसार कॉलेज मध्ये प्रवेश फी 18 हजार रुपये भरले होते परंतु माझ्या होस्टेलला नंबर न लागल्याने माझी राहण्याची व्यवस्था न झाल्यामुळे मी नियमित कॉलेजला जाऊ शकलो नाही याच काळात आर्मी भरती निघाली मी त्या भरतीमध्ये सिलेक्शन झालो.
त्यांनी शिक्षणाचे मूळ कागदपत्र सह मुलाखतीला बोलावले होते परंतु माझ्याकडे मूळ कागदपत्रे नव्हते मी त्या कालावधीमध्ये संबंधित विद्यालय प्रशासनाकडे माझ्या दिलेल्या कागदपत्रांची मागणी केली व मागणीचे कारण देखील सांगितले त्यांनी माझे काहीही एक ऐकून न घेता चार-पाच वेळा पासून केले त्यामुळे मला मिळणारे शासकीय नोकरी पासून मी वंचित राहिलो,
तसेच महाराष्ट्र पोलीस भरती करते वेळी देखील तीच परिस्थिती निर्माण झाली, शौक्षणिक कागदपत्रे नसल्याकारणाने, मला ग्राउंड ला जाऊ दिले नाही. आज काल मी भावी बेरोजगार आहे मी मध्यंतरी काळामध्ये आपले सरकार पोर्टलवर विद्यालयाच्या विरोधात झालेला प्रकाराबाबत तक्रार दाखल केली.
तक्रारीचे दखल घेत 31 ऑगस्ट 2024 रोजी कागदपत्रे महाविद्यालयात घेण्यासाठी बोलवले ते मला प्राप्त झाले परंतु मी आदिवासी भागात राहणार आदिवासी तरुण अशा पद्धतीने वागत असल्याकारणाने त्यामुळे माझे आत्वात नुकसान झाले.
त्यामुळे 2025 ते 2024 या काळात माझे झालेले आर्थिक नुकसान त्याचप्रमाणे नोकरी न लागल्यामुळे उपासमारीची वेळ सुशिक्षित असून शैक्षणिक कागदपत्रे नसल्या कारणामुळे मला माझे कुटुंबिक जीवन हात मजुरीवर भोगावे लागत आहे तरी मला विद्यालयाकडून पीडित असल्याकारणाने मला नुकसान भरपाई मिळावी ही नम्र विनंती.
फसवणूक झाल्यास नुकसान भरपाईसाठी लेखी तक्रार अर्ज लिहिण्याची प्रक्रिया आणि संबंधित माहिती खालीलप्रमाणे आहे:
फसवणूक, झाल्यास नुकसान भरपाई साठी कोठे अर्ज करावा?
1. पोलिस स्टेशन
- - जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये FIR नोंदवून (IPC धारा 420, 406 अंतर्गत).
- - ऑनलाइन तक्रार: [https://cybercrime.gov.in]) (सायबर गुन्हेसाठी).
2. शाळा / कॉलेज, संस्था
- - ऑनलाईन वेबसाईट असल्यास संबंधित वेबसाईट वर फ्रॉड झाल्यास संपर्क साधावा.
- - न्यायालय यांच्याकडे तक्रार करावी (90 दिवसांनंतर).
3. उपभोक्ता फोरम
- - सेवा/शाळा कॉलेज मध्ये फसवणूक झाल्यास, जिल्हा उपभोक्ता फोरममध्ये दावा (5-10 लाख पर्यंत).
4. सायबर सेल.
- - राज्य सायबर क्राइम विभागाकडे संपर्क करावा.
- - आपल्या सरकार ने ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी जारी केलीली वेबसाईटशी संपर्क करा.
नुकसान भरपाई मिळण्याची कालावधी
- - पोलिस/कायदेशीर प्रक्रिया : 6 महिने ते 2 वर्षे चा कालावधी असतो. (खटल्याच्या गुंतागुंतीवर अवलंबून).
- - शाळा कॉलेज यांच्या कडून भरपाई : 30-90 दिवस कालावधी असतो. (पुरावे पुरेसे असल्यास).
- - उपभोक्ता फोरम : 3-6 महिने (जर त्वरित निकाल येत असेल).
सूचना :
- - सर्व पुरावे सांभाळून ठेवा.
- - शाळा, कॉलेज संदर्भात वकिलाचा सल्ला घ्यावा.
- - शासन निर्णय नियमांनुसार फिनॅन्शियल फ्रॉडसाठी वेगवेगळ्या मार्गांनी तक्रार करता येते.
- अधिक माहितीसाठी संबंधित आपले सरकार च्या ऑनलाईन तक्रारी पोर्टल अधिकृत वेबसाइटवर तपासा आणि तेथेच तक्रारी करा.