जिल्हाधिकारी यांचे आदेश, दिवाळी सणानिमित्त तात्पुरत्या फटाके विक्री परवान्यासाठी २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत.
![]() |
दि. २ – विस्फोटक नियम २००८ मधील तरतुदीनुसार सन २०२५ दिवाळी निमित्त तात्पुरते फटाके परवाने देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
Apply Form | अर्ज फॉर्म
अर्ज फॉर्म न. ई-५ मध्ये करणे आवश्यक असून अर्जाचा नमुना संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात उपलब्ध राहील. विस्फोटक नियम २००८ मधील भाग २ मधील नियम ११३ (ए १३, viii) नुसार अर्ज छाननी फी ३०० रुपये तसेच भाग २ मधील नियम १०० व ११३ (१V) नुसार परवाना फी ५०० रुपये, अशा प्रकारे एकूण फी ८०० रुपये राहील.
परवाना फॉर्म | Parvana Form Apply
परवाना फॉर्म नं. एल.ई-५ साठी Administrative Services Receipt under Explosive Act under Collection, 0070 OAS या शीर्षकाखाली संगणक क्र. ००७०००८१०१ स्टेट बँकेत चलनाने भरावे व चलनाची मूळ प्रत अर्जासोबत जोडावी. परवाना फीचे चलन तहसील कार्यालयातून मंजूर करून घेऊन तालुका ठिकाणच्या स्टेट बँकेत भरता येईल.
![]() |
स्टॉल ग्रामपंचायत हद्दीत असल्यास ग्रामपंचायतीची शिफारस, महानगरपालिका हद्दीत असल्यास महानगरपालिकेची शिफारस, नगरपालिका हद्दीत असल्यास नगरपालिकेची शिफारस, तर छावणी हद्दीत असल्यास कार्यकारी अधिकारी, छावणी मंडळांची शिफारस जोडणे आवश्यक आहे.
विस्फोटक नियम २००८
नियोजित जागा वाणिज्य उपयोगासाठी बिनशेती असावी; नसल्यास सक्षम अधिकाऱ्यांची तात्पुरती बिनशेती परवानगी घेऊन सादर करावी. विस्फोटक नियम २००८ मधील नियम ८४, ८५ व ८६ नुसार नमूद केलेल्या बाबींसंदर्भात स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
फटाका स्टॉल बंदिस्त
फटाका स्टॉलकरिता उभारण्यात येणारा तंबू ज्वलनशील पदार्थाचा नसावा. स्टॉल बंदिस्त असावा व बेकायदेशीर व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही असा असावा. दोन स्टॉलमध्ये किमान तीन मीटर अंतर असावे तसेच ते संरक्षित कार्यस्थळापासून किमान ५० मीटर अंतरावर असावेत. स्टॉल समोरासमोर नसावेत.
स्टॉलमध्ये गॅसबत्ती, दिवा किंवा उघडे दिवे वापरू नयेत. विद्युत जोडणी लाकडी बोर्डद्वारे स्टॉलनिहाय असावी. तसेच ती भिंतीवर अथवा छतावर पक्क्या स्वरूपात असावी. प्रत्येक रांगेकरिता स्वतंत्र मास्टर स्विच बसविणे आवश्यक आहे.
फटाका स्टॉल अंतर
फटाका स्टॉलपासून ५० मीटरच्या आत फटाके उडविता येणार नाहीत. 1 का दुकान समूहामध्ये पन्नास पेक्षा जास्त दुकाने ठेवू नयेत. शोभेची दारू स्टॉलच्या खिडकीत प्रदर्शनासाठी ठेवू नये. विक्रीसाठी ठेवलेली शोभेची दारू आगप्रतिरोधक वस्तूमध्ये किंवा मूळ बाह्य आवरणासह ठेवावी. ती ज्वलनशील पदार्थ व दुकानातील रहदारीच्या जागेपासून योग्य अंतरावर ठेवणे आवश्यक आहे.
शोभेची दारू मूळ आवरणातून विक्रीसाठी काढल्यानंतर ती तात्काळ स्वच्छ, धुळीरहित जागेत व आगप्रतिरोधक पात्रामध्ये ठेवावी. फटाके साठवण्यासाठी व विक्रीसाठी परवाना असलेले दुकान अशा ज्वलनशील, विस्फोटक अथवा धोकादायक वस्तूंच्या साठवणूक परिसरापासून किमान १५ मीटर अंतरावर असावे.
फटाके विक्री दुकाने जनहित याचिका
जनहित याचिका क्र. १५३/२०१५ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार फटाके विक्री दुकाने निवासी जागेत किंवा तळघरात असू नयेत. ती भरवस्तीत नसून खुल्या जागेतच असावीत.
वरील सर्व बाबींची पूर्तता करूनच अर्ज सादर करावेत. परवाना तयार झाल्यानंतर तो तहसील कार्यालयातूनच घ्यावा. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच चुकीने प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.