वनसंवर्धनासाठी ग्रामठराव – आमला ग्रामस्थांचा एकमताने निर्णय

Admin
0
Vansavardhan-Gram-Sabha-Tharav


धडगाव, दि. २५ ऑगस्ट २०२५

वनसंरक्षण व संवर्धनासाठी ग्रामपातळीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. नियतक्षेत्र पिंपरीतील आमला गावात आज दुपारी झालेल्या ग्रामसभेत पो. पाटील, उपसरपंच, रोजगार सेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या एकमताने वनसंवर्धनासाठी ठोस ठराव पारित करण्यात आला.

गावात झालेल्या बैठकीत वनपाल, धडगाव यांनी ग्रामस्थांना जंगलाचे महत्त्व, पर्यावरणीय संतुलन आणि वनसंपत्तीचे संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

ग्रामठरावातील महत्त्वाचे निर्णय:

1. वनात वृक्षतोड केली जाणार नाही.

2. नवीन अतिक्रमण होणार नाही व जुने अतिक्रमण वाढवले जाणार नाही.

3. वन्यप्राण्यांची शिकार केली जाणार नाही.

4. मुरूम, दगड, गोटे यांसाठी अवैध खोदकाम व वाहतूक केली जाणार नाही.

5. झाडांपासून डिंक काढला जाणार नाही.

6. वनात आग लावली जाणार नाही तसेच बीडी-सिगारेटचे सेवन बंदी.

7. महसूल जागेवरील खाजगी झाडांची बिनपरवाना तोड होणार नाही.

8. मोड्या आणून विक्री केली जाणार नाही.

9. वणवा लागल्यास सर्व ग्रामस्थ मदत करतील.

10. अवैध वाहतूक होऊ देणार नाही.

दंडात्मक कारवाई:

1. गुन्हा आढळल्यास ₹10,000 दंड आकारला जाईल.

2. रात्री गुन्हा आढळल्यास ₹20,000 दंड आकारला जाईल.

आमला ग्रामस्थांनी घेतलेला हा ठराव वनसंरक्षणाच्या दृष्टीने एक आदर्श पाऊल ठरणार आहे. या निर्णयामुळे गावातील पर्यावरण संतुलन राखले जाईल, तसेच जंगलातील अवैध कृत्यांना आळा बसेल. गावकऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून वनसंपत्तीचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

#वनसंवर्धन  #जंगलवाचवा  #हरितमहाराष्ट्र  #ग्रामसभा  #वनसंरक्षण  #पर्यावरणसंरक्षण  #nandurbar  #CommunityInitiative

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)