आपले सरकार सेवा केंद्र चालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक | Aaple Sarkar Seva Kendra

Admin
0
आपले सरकार सेवा केंद्र चालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक Aaple Sarkar Seva Kendra

यवतमाळ जिल्ह्यात नाही तर प्रत्येक जिल्ह्यात ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र चालकाने आंदोलन करायला हवे. कारण, काही ठिकाणी पैसाने आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येतात. म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढायला हवे. (Aaple Sarkar Seva Kendra)

यवतमाळ : आपले सरकार सेवा केंद्र जाहिराती व अंतिम पात्र यादी संदर्भात आक्षेप व सुधारणा करण्यात यावी तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील जुन्या सामान्य सेवा केंद्र ग्रामस्तरीय उद्योजकांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

या प्रकरणातील परीक्षेतील गुण, कागदपत्रांच्या गुणांची नौद, (सीएससी) कार्यगुणवत्ताव सामाजिक उपक्रमांचे गुण चुकीचे आहेत. अनेक अर्जदारांना अयोग्यरीत्या अधिक गुण देण्यात आले आहेत. 

मूळ रहिवासी नसलेल्या अर्जदारांचे समावेशः काही अर्जदार हे यवतमाळ जिल्ह्याचे नसून पात्र यादीत आहेत. त्यांच्या मूळ रहिवास व कागदपत्रांची सखोल पडताळणी, तसेच बनावट किंवा पूर्वी निलंबित केंद्र चानक पात्रः काही अर्जदार यापूर्वी आपले सरकार केंद्र चालवत होते, 

मात्र फ्रेंड्युलेट कामामुळे त्यांचे केंद्र बंद करण्यात आले होते. तरीही त्यांना पुन्हा पात्र ठरवण्यात आल्याने सखोल चौकशी करावी तसेच सर्व अर्जदारांच्या मूळ कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करावी. पात्र ठरवलेल्यांची फिजिकल वेरिफिकेशन प्रक्रिया राबवावी,

एका ठिकाणी एकापेक्षा जास्त पात्र अर्ज असल्यास मुलाखती घ्याव्यात. ज्या व्हीएलड़ ने वर्षानुवर्षे शासनाचे उपक्रम राबवले आहेत, त्यांना प्राधान्य द्यावे, सीएससी जिल्हा व्यवस्थापकाकडून सर्व व्हीएलइ चे ट्रान्सेक्टीन व कार्यक्षमता अहवाल मागवून त्याचा विचार करावा सर्व प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य करावी, 

अशी मागणी जिल्ह्यातील जुने सामान्य सेवा केंद्र ग्रामस्तरीय उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी अजिंक्य ढोले, अब्दुल खालिद अब्दुल मजीद, आकाश कापसे, आकाश सौंदाळे, अनुजा सवई, बालाजी ठाकरे, चेतन पवार, भूषण देशपांडे, फिरोज शेख, गोपाल टाके, ज्ञानेश्वर शेगर, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Online Aaple Sarkar Seva Kendra Official website Link 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)