AgriStack Van Hakk GR : नमस्कार वाचक बंधुंनो आज मी वन हक्क धारक शेतकरी बांधवाना महत्वपूर्ण माहिती देत आहे, जेकी, जिल्ह्यातील वन हक्क धारकांनी अँग्रीस्टेक अंतर्गत नींदणी करणेबाबत. महत्वाचा शासन निर्णय शासनाने दिलेला आहे त्य बद्दल माहिती देत आहे.
जिल्ह्यातील वन हक्क धारक धारकांना ऍग्री स्टॅग अंतर्गत नोंदणी करणे बाबत शासन निर्णय अवलोकन केलेले आहे. तसेच कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या (MAHA DBT Agri Yojana) सर्व शासकीय योजना शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) दिनांक 15 /4/ 2025 पासून अनिवार्य करण्यात आले आहे. तरी वन हक्क प्रमाणपत्र धारकांना Agri Yojana साठी शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) काढणे सोपे होणार असून त्वरित ऑनलाईन नोंदणी च्या माध्यमातून काढण्यात येणार आहे.AgriStack Van Hakk GR :
महाराष्ट्र राज्यातील सर्व वन हक्क प्रमाणपत्र शेतकऱ्यांना अग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. वन हक्क प्रमाणपत्र शेतकरी बांधवांना ओळखपत्र क्रमांकासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या आधार कार्ड देखील असणे आवश्यक आहे असे. सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
![]() |
विभागीय आयुक्त चा शासन निर्णय.
विभागीय आयुक्त यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना राज्यातील वन हक्क धारकांना ऍग्री स्टाक अंतर्गत नोंदणी करणेबाबत शासन निर्णय द्वारे सूचना दिलेला आहे.
वन हक्क प्रमाणपत्र धारकांना MAHA DBT Yojana
कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या (MAHA DBT Agri Yojana) सर्व शासकीय योजना farmer id द्वारे मिळणार असून दिनांक 15 /4/ 2025 पासून अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व वन हक्क प्रमाणपत्र धारक शेतकऱ्यांना ऍग्री स्टाक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त यांनी सुरू केलेले आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांना ओळखपत्र क्रमांकासाठी संबंधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे असे देखील सूचना कळविले आहे.
वन हक्क धारकांची ॲग्रीक स्टाक अंतर्गत नोंदणी करण्याच्या अंमलबजावणी
वन हक्क अधिनियम 2006 अंतर्गत अधिनियमातील तरतुदीनुसार अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी यांना सुरक्षित हक्क, शेती करण्याचे व अधिनियमातील नमूद अन्य हक्क प्राप्त झालेले आहे. माहे एप्रिल 2025 अखेर राज्यात सुमारे दोन लाख सात शे सदूसष्ट वन हक्क मंजूर करण्यात आलेले असून सदर वन हक्क धारकांची ॲग्रीक स्टाक अंतर्गत त्वरित नोंदणी करण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी देखील शासन निर्णय याद्वारे करण्यात आलेली आहे.
वन हक्क प्रमाणपत्र धारकांच्या आधार क्रमांक द्वारे नोंदणी.
राज्यात देण्यात आलेल्या वन हक्क दाव्यांच्या जिल्ह्यानिहाय सविस्तर तपशील सोबतच्या प्रपत्र एक मध्ये जोडण्यात आलेले असून यासंदर्भात असे निर्दयनास आले आहे की याबाबतीत केवळ हजार वन हक्क धारकांच्या आधार क्रमांक आदी वन मित्र पोर्टलवर एन्ट्री करण्यात आलेली असून उर्वरित बऱ्याचशा वनात धारकांकडे आधार कार्ड असूनही त्यांचे आदी वन मित्र पोर्टलवर एन्ट्री करण्यात आलेली नाही अशा वनात धारकांच्या आधार क्रमांकाची त्वरित आदी वन मित्र पोर्टलवर एन्ट्री करण्यात यावी यावेळी सदर वन हक्क धारकांच्या माहितीमध्ये इतर त्रुटी आढळल्यास त्यादेखील सुधारण्यात यावे अशा विभागीय आयुक्त यांनी सूचना दिलेली आहे.
वन हक्क प्रमाणपत्र धारकांसाठी कॅम्प आयोजित करणे.
ज्या वन हक्क प्रमाणपत्र धारकांकडे आधार कार्ड नाहीत त्यांच्यासाठी त्वरित कॅम्प आयोजित करून त्यांना आधार क्रमांक कार्ड मोबाईल नंबर उपलब्ध करून देऊन वरील प्रमाणे त्याची आदी वनमित्र पोर्टल व डेटा एन्ट्री करण्यात यावी अशी देखील सूचना विभागीय आयुक्त यांनी दिलेली आहे.
वन हक्क धारकांच्या आधार लिंक.
राज्यातील सर्व वन हक्क प्रमाणपत्र धारकांचे आधार लिंक मोबाईल क्रमांकाची आदि वन मित्र पोर्टलवर एन्ट्री करण्यात यावी. अशा विभागीय आयुक्त यांनी सूचना दिलेली आहे.
वन हक्क धारकांना अधिनियम द्वारे लाभ देण्याची तरतूद.
वन हक्क प्रमाणपत्र धारकांना देण्यात येणाऱ्या सातबारा की ज्यामध्ये त्यांच्या इतर हक्कांमध्ये समावेश केला आहे तसेच वन कंपार्टमेंटच्या बाबतीत सातबारा ऐवजी देण्यात येणाऱ्या अनुसूचित ( J) हा वन हक्क प्रमाणपत्र धारकांना देण्यात आलेल्या वन पट्ट्यांच्या वन हक्कांचा अधिकृत शासकीय दस्तावेत असून (वन हक्क अधिनियम 16 अन्वये) वन हक्क धारकांना शासनाच्या सर्व योजना लाभ देण्याची तरतूद आहे.
मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय.
वन हक्क प्रमाणपत्र धारकांना राज्य शासनाच्या सर्व शासकीय योजनाच्या लाभ देण्याच्या आधारावर माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 13/03/2024 च्या शासन निर्णयान्वये, घेतलेल्या निर्णयानुसार वन हक्क प्रमाणपत्र धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
वन हक्क प्रमाणपत्र धारकांना स्वतंत्र सातबारा.
वन हक्क धारकांकडे त्यांच्या स्वतःच्या नावाच्या स्वतंत्र सातबारा नाही हा तर कलावून त्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत नाही त्यामुळे शासकीय योजनांच्या लाभ मिळावा व अशा योजना पासून ते वंचित राहू नये या उद्देशाने सदर योजनेच्या लाभ मिळण्यासाठी आवश्यक शासकीय दस्तावेज म्हणून वन हक्कांद्वारे प्राप्त इतर हक्क सदरच्या सातबारा व अनुसूचित जे ग्राहक धरण्यात येणार आहे
वन हक्क प्रमाणपत्र धारकांना अग्रिक स्टॉक फार्मर आयडी.
जमाबंदी आयुक्त तथा राज्य संचालक भूमि अभिलेख पुणे यांनी अ ब क प्रमाणे जिल्हा निहाय संकलित झालेली अद्यावत माहितीच्या आधारे युनिक आयडी देण्याची कार्यवाही केलेली आहे तसेच याबाबत बकेटिंग प्रक्रिया राबवून ॲग्रीक स्टॅगच्या अंतर्गत वन हक्क धारकांसाठी फार्मर आयडी काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी सूचना देखील देण्यात आलेली आहे.
निष्कर्ष
जिल्ह्यातील वन हक्क धारकांनी अँग्रीस्टॅक अंतर्गत नींदणी करणेबाबत चा शासन निर्णय महत्वाचा आहे, जो शासनाने जाहीर केलेला आहे. राज्यातील सर्व वन हक्क प्रमाणपत्र धारक शेतकरी आहेत. आता सर्व शासकीय योजनाचा योग्य तो लाभ मिळेल. त्या शासकीय योजनांची माहिती हवी असल्यास आमचा सोसिअल मिडिया आजच जॉईन व्हा जेणेकरून कोणत्या योजना कधी चालू राहतील व बंद राहतील. त्याची माहिती मिळेल.
वनहक्क धारक अँग्रीस्टॅक बद्दल थोडक्यात माहिती (Is a plot near the city a good investment?)
वन हक्क धारकांनी अँग्रीस्टॅकचे मुख्य उद्देश | |
अधिकृत वेबसाइट | |
मुख्य वेबसाइट | |
Facebook चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी | |
व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी | |
टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी |