मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणजे कोण? Who is the Chief Executive Officer?

Admin
0
Who is the Chief Executive Officer? : नमस्कार वाचक मित्रांनो mahamnews वेबसाईट वर आपले स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला  मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणजे कोण? (Who is the Chief Executive Officer?) आणि त्याची कामे जबाबदाऱ्या कोणत्या अशी संपूर्ण माहिती देत आहोत.

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणजे कोण? Who is the Chief Executive Officer?

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणजे कोण? Who is the Chief Executive Officer?

 IAS किंवा MPSC राज्यसेवा परीक्षेतून निवडलेला आलेला आणि राज्यामधील जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्वच पंचायत समित्या, व त्यामधील येणाऱ्या ग्रामपंचायती विकास योजना राबविणारा अधिकारी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी होय.

पदाचे नाव

  • मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO)
  • जिल्हा परिषदेचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी.

नेमणूक कोण करतो?

  • राज्य शासन (महाराष्ट्र सरकार).
  • सामान्यतः  मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हा अधिकारी IAS किंवा MPSC राज्यसेवा परीक्षेतून निवडलेला असतो.

मुख्य कार्यकारी अधिकारी बद्दल अधिक माहिती (Who is the Chief Executive Officer?)

 मुख्य कार्यकारी अधिकारीचे मुख्य उद्देश

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट

येथे क्लिक करा

मुख्य वेबसाइट

येथे क्लिक करा

Facebook चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

CEO चा कार्यक्षेत्र कोणतं?

  • जिल्हा परिषद (Zilla Parishad) ही ग्रामीण भागातील एक प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
  • संबंधित जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्वच पंचायत समित्या, आणि त्यामध्ये ग्रामपंचायती असतात. या सर्वांमध्ये यांचा समन्वय, विकास योजना राबविणे हे काम  मुख्य कार्यकारी अधिकारी करतो.

 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या (CEO) मुख्य जबाबदाऱ्या 

  • जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच (शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, कृषी)
  • नियंत्रण.
  • अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखरेख.
  • राज्य व केंद्र शासनाच्या सर्व ग्रामीण विकास योजनांची अंमलबजावणी (उदा. पंतप्रधान ग्रामसडक योजना, जल जीवन मिशन इ.)
  • जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाचे नियोजन व खर्चावर देखरेख.
  • जिल्हा परिषदेच्या बैठका बोलावणे, ठराव अंमलात आणणे.
  • पंचायत समित्यांच्या कामावर देखरेख.
  • ग्रामपंचायतींना मार्गदर्शन व प्रशासनिक मदत.
  • अप्रामाणिक कारभार असल्यास कारवाई करण्याचा अधिकार.

आवश्यक पात्रता

  1. शैक्षणिक पात्रता :पदवी
  2. नेमणूक: राज्य शासनामार्फत

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे अधिकार

  • जिल्हा परिषदेतील सर्व अधिकाऱ्यांवर नियंत्रण.
  • प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार.
  • काही शिस्तभंगाच्या कारवायांसाठी अधिकार.
  • ग्रामपंचायत विघटन / निलंबन प्रस्ताव पाठवण्याचा अधिकार (शासनाकडे).

 मुख्य कार्यकारी अधिकारी कोणाच्या अधीन काम करतो?

  • राज्य सरकार
  • जिल्हा परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष हे राजकीय प्रमुख असतात, पण  मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासकीय प्रमुख असतो.

एकूण कार्यपद्धती उदाहरणासह

उदा.

  • जिल्ह्यात आरोग्य विभागात गडबड आहे, तर CEO तात्काळः
  • अहवाल मागवतो.
  • जबाबदार कर्मचाऱ्यांना नोटीस देतो.
  • सुधारणा आराखडा तयार करतो.
  • जिल्हा परिषदेच्या बैठकीत ठराव मांडतो.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची महत्वाची वैशिष्ट्ये

  1. प्रशासकीय अनुभव: मोठ्या प्रमाणावर
  2. अधिकार: निर्णय, देखरेख, बजेट नियंत्रण
  3. जबाबदारी: जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचे नेतृत्व
  4. समन्वय: शासकीय योजना व स्थानिक स्वराज्य संस्था यामधील

CEO यांच्या नियंत्रणातील अधिकारी

- मुख्य कार्यकारी अधिकारी खालील प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवतातः
  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी (उप CEO)
  • विभाग प्रमुख - शिक्षण अधिकारी, बांधकाम अभियंता, आरोग्य अधिकारी
  • पंचायत समितिचे गटविकास अधिकारी (BDO)
  • जिल्हा लेखा अधिकारी
  • प्रशासक व अधिकारी लिपिक वर्ग इत्यदी.

CEOचे अधिकार व मर्यादा

अधिकार

  • प्रशासकीय निर्णय घेणे.
  • विकास आराखडा तयार करणे.
  • योजना राबवण्याचा अधिकार.
  • निधी वितरण, खर्च मान्यता.

मर्यादा

  • कोणतीही राजकीय भूमिका नाही.
  • सर्व निर्णय शासन धोरणानुसार घ्यावे लागतात.
  • अध्यक्ष व सभेच्या ठरावांचे पालन करणे आवश्यक.

CEO संदर्भात महत्त्वाचे कायदे व नियम

  • 1 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 CEO पदाची स्थापना, अधिकार, कर्तव्य.
  • 2 सेवा नियमावली कर्मचारी व अधिकाऱ्यांचे शिस्तपालन
  • 3 सरकारी आदेश (GR) विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी, मार्गदर्शक.

CEO चे विभागनिहाय कामकाज

शिक्षण विभाग 

  •  जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे नियोजन, शिक्षकांची भरती, शैक्षणिक गुणवत्ता.

आरोग्य विभाग 

  • प्आराथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आरोग्य सेवा योजना, गावोगावी आरोग्य शिबिरे.

कृषी विभाग 

  • शेतकऱ्यांसाठी योजना, कृषी प्रदर्शन, खत व बियाण्यांची शुद्धता तपासणी.

जलसंधारण / पाणीपुरवठा 

  • नळयोजना, जल जीवन मिशन, पाणी टंचाई उपाय योजना.

ग्रामविकास विभाग 

  • प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, रस्ते, घरकुल योजना.

महत्त्वाचे लक्षात ठेवा

  • जिल्हा परिषद अध्यक्ष हा राजकीय नेता असतो.
  • मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हा प्रशासकीय अधिकारी असतो.
  • दोघंही मिळून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी काम करतात, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी CEO कडे असते.
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणजे कोण? Who is the Chief Executive Officer?

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला " मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणजे कोण?" ची शक्य तेवढी माहिती  (CEO) बद्दल  देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की  मुख्य कार्यकारी अधिकारी चे काम काय आहे, (CEO)  या अधिकाऱ्याचे जबाबदारी काय आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा जिल्हासाठी कामे पाहणाचे महत्व काय आणि कसे अशी संपून माहिती वाचली आहे.

तसेच तुम्हाला " मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणजे कोण?" आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर ग्रामीण भागातील नातेवाईकांना (Who is the Chief Executive Officer?) हि माहिती जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला Who is the Chief Executive Officer? या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)