मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर योजना: MGNREGA Sinchan Vihir Yojana

Admin
0
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर योजना – शेतीच्या समृद्धीकडे वाटचाल! MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025 : नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025 (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA 2025) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मनरेगा सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीस सिंचनाच्या दृष्टीने स्थायिक व टिकावू उपाय उपलब्ध करून शेतकरी बांधवांना भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे.
मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर योजना: MGNREGA Sinchan Vihir Yojana

चला तर मग 'मनरेगा सिंचन विहीर योजना 2025' ची सविस्तर माहिती जसे की ही योजना नक्की काय आहे? मनरेगा सिंचन विहीर योजना योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? मनरेगा सिंचन विहीर योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? मनरेगा सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? महत्वाचं म्हणजे मनरेगा सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र ठरणार आहे? मनरेगा सिंचन विहीर योजनेच्या कोणत्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत? त्याचबरोबर मनरेगा सिंचन विहीर योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे? आणि या योजनेचा ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे? इत्यादी संपूर्ण माहिती आपण खालील लेखाद्वारे पाहणार आहोत.

वैयक्तिक सिंचन विहीर हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या राज्यातील सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. अशातच महाराष्ट्र राज्य सरकारच्या पंचायत समिती कडून रोजगार हमी योजना मार्फत राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025 (मनरेगा सिंचन विहीर योजना 2025) होय.

MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025 (मनरेगा सिंचन विहीर योजना 2025) च्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यां बांधवांना शेतीच्या सिंचनासाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शासनामार्फत 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकऱ्यां बांधवांना आपल्या पिकाला पाण्याची सोय उपलब्ध करून बागायती क्षेत्र वाढवणे, तसेच त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा आर्थिक विकास व्हावा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना लखपती कुटुंब बनविण्याकडे, राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागणार आहे.

मनरेगा सिंचन विहीर योजना 2025 थोडक्यात माहिती

योजनेचे नाव

MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025(मनरेगा सिंचन विहीर योजना 2025)

योजनेची सुरुवात कोणी केली.

प्रथम महाराष्ट्र सरकार 

Facebook चॅनेलमध्ये सामील व्हा.

 येथे क्लिक करा

व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील व्हा.

येथे क्लिक करा

टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा

येथे क्लिक करा

योजनेची सुरुवात कधी झाली

सन २०११

योजनेचे मुख्य उद्देश

शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधण्यासाठी अनुदान देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

योजनेचे लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी

अर्ज करण्याची प्रक्रिया

ऑनलाइन आणि ऑफलाईन

अधिकृत वेबसाइट

येथे क्लिक करा

मुख्य वेबसाईट

येथे क्लिक करा

MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025 योजेनचे लाभार्थी

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया वैयक्तिक सिंचन विहीर म्हणजे"मनरेगा सिंचन विहीर योजना 2025" चे लाभार्थी कोण कोण आहेत?
  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी बांधव
  • राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी बांधव या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025: लाभ

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया "मनरेगा सिंचन विहीर योजना 2025" च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
  • MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025 (मनरेगा सिंचन विहीर योजना 2025) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सिंचन विहीर बांधण्यासाठी शासनामार्फत 4 लाख अनुदान दिले जाणार आहे.

MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025: मिळणारे अनुदान

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया "मनरेगा सिंचन विहीर योजना 2025" च्या माध्यमातून किती अनुदान देण्यात येणार आहे?
  • सद्यस्थिती (जून 2025):
  • सुरू असलेली कामे – 623 सिंचन विहिरी
  • मंजूर कामे – 255 सिंचन विहिरी

MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025: पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया "मनरेगा सिंचन विहीर योजना 2025" साठी काय काय पात्रता आवश्यक आहेत? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती आहेत?
  • MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025 (मनरेगा सिंचन विहीर योजना 2025) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा ग्रामीण भागातील अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावा.
  • अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला
  • महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असणे बंधनकारक आहे.
  • तसेच अर्जदार शेतकऱ्याकडे 0.25 हेक्टर ते 5 हेक्टर पर्यंत नवीन विहीरीसाठी जमीन असणे आवश्यक आहे.
  • महत्वाचं म्हणजे मनरेगा योजनेच्या माध्यमातून एकदा लाभ घेतल्यानंतर पुढील 5 वर्ष लाभार्थीस लाभ घेता येणार नाही.

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे:

  1.  विहित नमुन्यात अर्ज
  2. कृती आराखडा
  3. ग्रामसभा ठराव
  4. ऑनलाईन डिजिटल ७/१२ व ८अ उतारे
  5. जॉबकार्ड व आधार कार्ड
  6. बँक पासबुक
  7. चर्तु:सीमा दाखला (तलाठी)
  8. लाभ न घेतल्याचा कृषी अधिकारी दाखला (इतर योजनांतर्गत)
  9. सामूहिक विहिरीसाठी सर्व लाभार्थ्यांचा करार
  10. इतर नावांवरील शेतजमिनीसाठी संमतीपत्र
  11. हरकत दाखला (शिवार बाहेर शेती असल्यास)

योजनेचा उद्देश:

“हर खेत को पानी” या केंद्र शासनाच्या दृष्टीकोनातून, प्रत्येक गावात किमान 15 विहिरींची उद्दिष्टपूर्ती करून बागायती क्षेत्र वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना लखपती कुटुंब बनविण्याकडे प्रगती करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना जलसिंचनाची शाश्वत सुविधा मिळून, उत्पन्नात वाढ होते. एकदा विहीर बांधली की त्याचा परिणाम वर्षानुवर्षे राहतो, त्यामुळे हा एक दीर्घकालीन आर्थिक विकासाचा आधार ठरतो.

MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025: अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया "मनरेगा सिंचन विहीर योजना 2025" चा अर्ज कसा करायचा आहे?
ऑनलाइन अर्ज पद्धत :-
  • MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025 (मनरेगा सिंचन विहीर योजना 2025) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी अर्जदारास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या https://mahaegs.maharashtra.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे. 
  • त्यानंतर तुम्हाला खालील फोटो प्रमाणे लाभार्थी निवडून -login/ लॉगिन करून त्यामध्ये तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागणार आहे.  
मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर योजना: MGNREGA Sinchan Vihir Yojana Log In

  • त्यासाठी तुम्हाला 'नवीन लाभार्थी लॉगिन म्हणून अर्जदार विहीर नोंदणी' या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

विहीर नोंदणी apps
  • त्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठ वरून 'वैयक्तिक तपशील' भरावयाची आहे,

विहीर नोंदणी अधिकृत माहिती

  • वरील फोटो मध्ये विचारलेल्या  संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर आता तुम्हाला आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, शेताचे कागदपत्रे असेल तर होय करायचे आहे अन्यथा नाही करायचे आहे.
  • त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, शेतकरी अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र होय करायचे आहे अन्यथा नाही करायचे आहे.
  • त्याचबरोबर ऑनलाईन आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला टॅब ओपन करा व त्यामध्ये तुमचा कायमचा पत्ता व पत्रव्यवहार पत्ता भरून घ्या.
  • त्यानंतर जमिनीचा 8 अ उतारा अपलोड करा, त्याचबरोबर तुम्हाला किती शेती आहे ते देखील नोंदवा.
  • त्यानंतर मुख्य पेजवर यावे व इतर आवश्यक माहिती भरावी, तसेच पर्यावरण शेतात असलेल्या सिंचन स्वतःचा तपशील भरणे आवश्यक आहे.
  • आता होमपेज वरील 'नवीन विहीर साठी अर्ज करा' या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये नवीन विहीरीचे बांधकाम हा पर्याय म्हणून योजना निवडून घ्यावी.
अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुमची MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025 (मनरेगा सिंचन विहीर योजना 2025) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

ऑफलाईन अर्ज पद्धत: 

आम्ही खाली PDF देत आहोत, तो हाताने भरून विचारलेली माहिती भरून आणि विचारलेले सर्व कागदपत्रे जोडून ऑफलाईन अर्जासाठी ग्रामपंचायत, कृषी सहायक वा पंचायत समितीच्या मनरेगा विभागाशी संपर्क साधून जमा करावा.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला "मनरेगा सिंचन विहीर योजना 2025" ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की मनरेगा सिंचन विहिर कशी आहे, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो.

तसेच तुम्हाला "मनरेगा सिंचन विहीर योजना 2025" आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर ग्रामीण भागातील नातेवाईकांना आणि ग्रामीण भागातील जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला MGNREGA Sinchan Vihir Yojana 2025 : या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर योजना माहिती (MGNREGA Sinchan Vihir Yojana)

पडिक जमीन चे मुख्य उद्देश

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट

येथे क्लिक करा

मुख्य वेबसाइट

येथे क्लिक करा

Facebook चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)