ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार कसा ओळखायचा?

Admin
0
What is Gram Panchayat corruption? : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार म्हणजे काय?आणि ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार कसा ओळखायचा? माहिती अधिकार कायदा अंतर्गत अर्ज, करून ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार कसा बघावा, अशी माहिती देत आहे. (What is Gram Panchayat corruption?)

तर ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार म्हणजे काय?, ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार कसा ओळखायचा?, ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्थानिक उपाय, ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी कुठे करता येतात? अशी संपूर्ण माहिती देत आहे.
What is Gram Panchayat corruption?

ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार म्हणजे काय? (What is Gram Panchayat corruption?)

ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार म्हणजे खोटे कामे करून पैसा लुबाडणे, जे ग्रामपंचायतीच्या निधीत अफरातफर करतात, जनतेला कामे करत आहे, असे भासवणे, खोटे कामे कागदोपत्री दाखवून पैसा काढणे असे अनेक उदाहरणे आहेत, यालाच ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार असे म्हणतात येईल.

ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार कसा ओळखायचा? (How to identify corruption in the work of Gram Panchayat?)

1 काम झाले नाही - पण बिल पास

  • उदा: रस्ता, गटार, लाईटसची कामं प्रत्यक्षात नाहीत, पण खर्च दाखवलेला आहे.
  • उपाय: साइटवर जाऊन पाहणी कर करा. नोंदी मागा

2 बिल न दाखवता पैसे दिले जातात

  • उदा: सरकारी कामाचे बिल, वर्क ऑर्डर, M-Book दाखवले जात नाहीत.
  • उपाय: RTI (माहितीचा अधिकार) वापरून ती माहिती मागवू शकता.

3 ग्रामसभा नियमित होत नाही

  • ग्रामसभा ही भ्रष्टाचार रोखण्याचं मुख्य माध्यम आहे. ती जर होत नसेल किंवा लोकांना बोलावलं जात नसेल तर संशय बाळगा

4 काम केल्याच्या फोटोंमध्ये फसवणूक

  • एखादं नवीन बांधकाम झाले आहे, असं दाखवण्यासाठी जुन्या फोटोंचा वापर केला जातो.

5. फक्त एकाच ठेकेदाराला तेच तेच किंवा वारंवार कामं दिली जातात.

  • स्पर्धा न करता नेहमी एकाच माणसाला काम मिळणं हे चुकीचं आहे. हे "नाते" असण्याची शक्यता.

6 फसव्या स्वाक्षऱ्या (बोगस ठराव)

  • काही वेळा सदस्यांच्या नकळत ठराव मंजूर करून स्वाक्षऱ्या लावल्या जातात.
  • उपाय: RTI ने ठरावाच्या कॉपी मागवा. त्यातील नावे व सह्या तपासा.

7 खर्चाचा हिशोब ग्रामपंचायतमध्ये लावला जात नाही

  • वर्षाच्या शेवटी किंवा ठरावीक काळाने हिशोब ग्रामसभेत लावला पाहिजे. तो जर लपवला जात असेल तर संशय ठरतो.

8 गावातील लोकांचा सहभाग टाळला जातो.

  • जेव्हा गावातील लोक प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांना गप्प बसवले जाते, त्यांच्यावर दबाव आणला जातो, किंवा धमक्या दिल्या जातात - हे भ्रष्टाचाराचं मोठं लक्षण.

9 मंजुरी घेण्यापूर्वीच काम सुरू होणे

  • | सरकारी नियमांनुसार कुठलेही काम फक्त ठराव, अंदाजपत्रक, वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर सुरू होऊ शकते.
  • जर काम आधीच सुरू असेल, तर ते "पछाडलेलं बिल" (back-dated) असण्याची शक्यता असते.

10 समान वस्तूंना वेगवेगळे दर

  • उदा. LED लाइट 1 गावात ₹900 दाखवलेले, आणि दुसऱ्या गावात ₹1500 - यावरून किकबॅकचा अंदाज येतो.
  • उपायः इतर गावांच्या खर्चाशी तुलना करा.

11 कामाचा दर्जा अत्यंत खराब असणे

  • रस्त्यावर बांधकाम झाल्यापासून पहिल्या महिन्यात कमी पण जास्त करून 2-3 महिन्यातच खड्डे पडतात, साईट पट्टी ड्रेनेज तुटते - हे सगळं "low cost, high bill" तंत्र आहे.

12 काम करणारे मजूर 'फक्त नावापुरते'

  • मजुरांची यादी दाखवली जाते पण प्रत्यक्षात ते काम करतच नसतात.
  • उपाय: MGNREGA, शौचालय, मनरेगा लिस्ट मधून नावे तपासा.

13 निवडणुकीपूर्वी अचानक विकास कामांची घोषणा

  • यामागे अनेकदा पैसा लाटण्याचा हेतू असतो - तातडीने मंजूरी, कमी वेळेत कामं, बिलात घोटाळा.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्थानिक उपाय

1 RTI अर्ज

  • ग्रामपंचायतीच्या कामाचे वर्क ऑर्डर, बिल, मंजुरीचे ठराव, खर्च अहवाल मागवा. लिंक वर क्लिक करा. ग्रामपंचायतीच्या सर्व माहिती अधिकाराचे नमुने आहे.

2 ग्रामसभा 

  • सार्वजनिक रेकॉर्डिंग केल्यास गुन्हा नाही, म्हणून शक्यतो व्हिडिओ रेकॉर्ड ठेवा, प्रश्न विचारा, सोसिअल मिडिया ला व्हायरल करा.

3 जिल्हा परिषद 

  • संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषद चा वेबसाइट निधी आणि कामांची माहिती तिथे असते.

4 सोशल मीडिया 

  • भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पोस्ट गावातील ग्रामपंचायत WhatsApp ग्रुप, Instagram, Facebook, You Tube News Channel, वृत्तपत्रा द्वारे व्हायरल करा.

5 लोकशाही दिन 

  • जनसुनावणी प्रत्येक महिन्याला तहसील कार्यालयात असतो.

भ्रष्टाचाराच्या तक्रारी कुठे करता येतात ?

भ्रष्टाचाराच्या तक्रारी खालील ठिकाणी करता येतात.
  • तालुका पंचायत समिती : BDO (Block Development Officer) 
  • जिल्हा परिषद :  Zilla Parishad / CEO मुख्य कार्यकारी अधिकारी.
  • मंत्रालय : मुख्यमंत्री कडे.
  • लोकसेवक : शेवटचे लोकसेवक कडे कारण सर्व अधिकारी निलंबित होणाच्या रडारवर राहतील.
सर्व प्रथम आपल्या तालुका ठिकाणी करा. म्हणजे पंचायत समिती BDO (Block Development Officer)
येथे लेखी आणि पुरावा सह तक्रारी अर्ज द्या, त्यानंतर पुन्हा २८ दिवसानंतर काही हालचाली होत आहे, किंवा नाही याचा तपास करा. त्यानंतर जिल्हा पातळी वर Zilla Parishad / CEO यांच्या कडे तक्रारी करा, मुद्दा असा लिहा कि, सदर माझा गावातील भ्रष्टाचार झालेला असून मी या दिवशी लेखी पुरावे सह तक्रारी अर्ज केले, परंतु, पंचायत समिती BDO (Block Development Officer) हे सदर गावातील या व्यक्तीला किंवा अधिकारी यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या मुळे मी आपणास देखील लेखी तक्रारी अर्ज देत आहे. असे स्पष्ट लिहा. 

वरीलप्रमाणे लेखी अर्ज दिल्या प्रमाणे नंतर पुन्हा ऑनलाईन आपले सरकार च्या पोर्टल वर तक्रारी अर्ज लिहा. आणि त्यात असा मुद्दा लिहा कि, मी केलेल्या तक्रारी BDO (Block Development Officer) आणि Zilla Parishad / CEO यांनी कुठलीही एक चौकशी केलेली नाही, यांना निलंबित करण्याचे आदेश पारित करावे. असे अर्ज मुख्यमंत्री यांच्या कडे करावे.

निष्कर्ष:

वरील लेखा नुसार आपल्याला समजलेच असेल कि, "ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार म्हणजे काय?" (What is Gram Panchayat corruption?). ची माहिती हा लेख आवडलाच असेल तरी, ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार म्हणजे काय?आणि ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार कसा ओळखायचा? माहिती अधिकार कायदा अंतर्गत अर्ज, करून ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार कसा बघावा,?, अशा बद्दल आपल्या मनात अजून काही प्रश्न असतील तर खालील कमेंट करून सांगा. आम्ही नक्कीच ओर्षांचे उत्तर देऊ. 

ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार कसा ओळखायचा?  हा लेख आपल्या ग्रामपंचायत ग्रुप ला किंवा आपल्या मित्राला शेअर करा. किंवा आमच्या सोसिअल मिडियाला जॉईन व्हा. जेणेकरून अशाच नवनवीन माहिती मिळत राहतील. धन्यवाद.

ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार बद्दल थोडक्यात माहिती (What is Gram Panchayat corruption?)

ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार चे मुख्य उद्देश

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट

येथे क्लिक करा

मुख्य वेबसाइट

येथे क्लिक करा

Facebook चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)