तर नगरपरिषद म्हणजे काय?, नगरपरिषद चे कार्य काय, नगरपरिषद ची प्रशासकीय रचना कशी आहे, उदिष्ट्य, मत्त्वाच्या जबाबदाऱ्या कोणत्या, नगरपरिषद केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना व निधी, नगरपरिषदची गरज का आहे?, अशी संपूर्ण माहिती देत आहे.
नगरपरिषद म्हणजे काय? ( What is a municipal council?)
- नगरपरिषद म्हणजे (Municipal Council किंवा Municipal Committee) असे आहे,जे शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थेचे एक स्वरूप आहे.
- ज्या शहराची लोकसंख्या साधारणतः २५,००० ते ३ लाखांपर्यंत असते, तिथे नगरपरिषद स्थापन केली जाते.
- नगरपरिषद हा एक स्वायत्त शासकीय मंडळ आहे, नगरपरिषद हे केंद्र किंवा राज्यशासनाच्या नियंत्रणाखाली परंतु स्वतंत्रपणे स्थानिक कारभार पाहते.
नगरपरिषदेचे कार्य
- रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल.
- रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी दिव्यांची व्यवस्था.
- पाणीपुरवठा (पिण्याचे व वापराचे पाणी).
- घनकचरा व्यवस्थापन (कचऱ्याची उचल व विल्हेवाट).
- सांडपाणी व्यवस्थापन.
- स्वच्छता व सार्वजानिक आरोग्य सेवा.
- सार्वजानिक उद्याने बागा तयार करणे व देखभाल करणे.
- नवे रस्ते, पूल, इमारती तयार करणे.
- प्राथमिक शाळा चालवणे किंवा सहाय्य करणे.
- ग्रंथालये तयार करणे.
- प्राथमिक आरोग्य केंद्रे चालवणे.
- टीकाकरण व आरोग्य जनजागृती कार्यक्रम.
- आठवडे बाजार, माळ (market yard) चालवणे.
- जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी करणे.
- मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर स्थानिक कर आकारणी.
नगरपरिषदेची रचना
१. नगरसेवक (Councilors)
शहरातील विविध प्रभागांमधून निवडून येणारे लोकप्रतिनिधी.२. अध्यक्ष (President/Chairperson)
नगरपरिषदेचा प्रमुख (जनतेतून निवडला जातो किंवा नगरसेवकांमधून निवड होतो).३. मुख्याधिकारी (Chief Officer)
राज्य शासनाकडून नियुक्त अधिकारी, जो सर्व प्रशासकीय कामकाज बघतो.उत्पन्नाचे स्रोत
- मालमत्ता कर
- पाणीपट्टी
- बाजारफळी, दुकान भाडे
- शासनाकडून मिळणारे अनुदान
- विविध सेवा शुल्क
कायद्याअंतर्गत स्थापना
महाराष्ट्रामध्येः
महाराष्ट्रामध्ये मराठीत महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ असे म्हणतात तर,इंग्रजीत (Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965) असे म्हणतात, यानुसार नगरपरिषद या अधिनियम अंतर्गत स्थापन होतात.
भारतात
७४ वा घटनादरुस्ती अधिनियम, १९९२ (७४th Constitutional Amendment) नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनेत मान्यता मिळाली.
नगरपरिषदेचे प्रकार
- शहराच्या लोकसंख्येनुसार नगरपरिषदेची विभागणी केली जाते.
- क्लास A, B, C नगरपरिषद
- उदा.:
- A Class: १ लाख ते ३ लाख लोकसंख्या
- B Class: ५०,००० ते १ लाख
- C Class: २५,००० ते ५०,०००
नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया
- प्रत्येक ५ वर्षांनी निवडणुका.
- प्रत्येक प्रभागातून नगरसेवक निवडले जातात.
- आरक्षण (SC, ST, OBC, महिलांसाठी) लागू असते.
- नगरसेवकांमधूनच अध्यक्षाची निवड होते.
नगरपरिषदेचे अधिकार
- स्थानिक कर लावणे व वसूल करणे.
- शहर नियोजन - नवीन बांधकामांना परवानगी.
- सार्वजनिक आरोग्य योजना आखणे.
- आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका.
- नागरिकांना विविध प्रमाणपत्रे देणे (जन्म, मृत्यू इ.).
नगरपरिषदेच्या निधीचा वापर
- रस्ते, गटारी व जलवाहिन्या सुधारणा करणे.
- आरोग्य व स्वच्छता कार्यक्रम करणे.
- शाळांसाठी निधी चा वापर करणे.
- महिला सक्षमीकरणासाठी योजना राबवणे.
- सांस्कृतिक कार्यक्रम व उत्सव साजरा करणे.
- नगरपरिषद आणि नागरिकांचे हक्क काय ते समस्या सोडवणे.
- कोणताही नागरिक मालमत्ता कर भरून स्वतःच्या प्रॉपर्टीची नोंदणी अपडेट करू शकतो. त्याची माहिती ठेवणे.
- नगरपरिषदेकडून विविध सेवा मागणी (पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन) करून कामे करू शकतो
- माहितीच्या अधिकारातून (RTI) नगरपरिषदेचे माहिती मिळवू शकतो. आणि कोणते कामे कशे झाले त्याची जनतेला सांगू शकतो.
- नगरसेवकांकडे आपल्या समस्यांचा पाठपुरावा करू शकतो.
नगरपरिषदेतील प्रमुख अधिकारी
मुख्याधिकारी- 1 प्रशासकीय प्रमुख: सर्व विभागांचे नियंत्रण
- 2 नगराध्यक्ष: नगरपरिषदेचा प्रमुख, राजकीय नेतृत्व
- 3 नगरसेवक: प्रभागातील लोकप्रतिनिधी
- 4 अभियंता: बांधकाम कामकाज
- 5 आरोग्य अधिकारी: आरोग्य व स्वच्छता व्यवस्था
नगरपरिषदेच्या माध्यमातून चालणाऱ्या योजना
- पंतप्रधान आवास योजना
- स्वच्छ भारत अभियान
- अमृत योजना (पाणी व मलनिस्सारण प्रकल्प)
- स्मार्ट सिटी योजनेतील छोटे प्रकल्प
- आरोग्य भारत योजना
- अन्न व औषध प्रशासन योजना (खाद्य परवाने)
नवीन नगरपरिषद कशी जाहीर होते ?
- नवीन नगरपरिषद जाहीर करायचे असल्यास राज्य सरकारच्या अध्यादेशाने (Notification by Government Gazette) नवीन नगरपरिषदेची घोषणा होते.
- विशिष्ट लोकसंख्येच्या निकषांनुसार आणि शहरीकरणाच्या दर्जानुसार.
निष्कर्ष:
वरील लेखा नुसार आपल्याला समजलेच असेल कि, "नगरपरिषद म्हणजे काय?" (What is a municipal council?). नगरपरिषद ची माहिती हा लेख आवडलाच असेल तरी, नगरपरिषद चे कार्य काय, नगरपरिषद ची प्रशासकीय रचना कशी आहे, उदिष्ट्य, मत्त्वाच्या जबाबदाऱ्या कोणत्या, नगरपरिषद केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना व निधी, नगरपरिषदची गरज का आहे?, नगरपरिषद चे अनेक स्पर्धा परीक्षेला मध्ये काही प्रश्न विचारले जातात. त्या साठी हा लेख आपल्या आवडीचा मित्राला शेअर करा. किंवा आमच्या सोसिअल मिडियाला जॉईन व्हा. जेणेकरून अशाच नवनवीन माहिती मिळत राहतील. धन्यवाद.
नगरपरिषद बद्दल थोडक्यात माहिती (What is a municipal council?)
नगरपरिषद चे मुख्य उद्देश | |
अधिकृत वेबसाइट | |
मुख्य वेबसाइट | |
Facebook चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी | |
व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी | |
टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी |